शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मुलांचे टळले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऊसतोड कामासाठी समशेरपूर ता.नंदुरबार भागात आलेल्या कन्नड, चाळीसगाव व मालेगाव येथील कामगारांच्या ३५ पाल्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऊसतोड कामासाठी समशेरपूर ता.नंदुरबार भागात आलेल्या कन्नड, चाळीसगाव व मालेगाव येथील कामगारांच्या ३५ पाल्यांच्या शिक्षणाची सुविधा आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखानामार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे या मुलांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी कारखाना परिक्षेत्रातील ऊस कापणीसाठी चाळीसगाव, धुळे, कन्नड, साक्री व मालेगाव भागातून ऊसतोड कामगार दाखल झाले आहे. काही कौटुंबिक अडचणींमुळे या कामगारांनी शालेय शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या पाल्यांनाही सोबत आणले आहे. या मजुरांनी समशेरपूर साखर कारखान्याजवळ वसाहत निर्माण केली आहे. तेथे पौढ व्यक्तींसह काही सहा ते १४ वर्ष वयोगटातील मुलेही दिसून येत होते. त्यामुळे ही मुले शाळाबाह्य अथवा शालेय शिक्षण घेणारे असू शकतात, अशी शंका काही घटकांमधून उपस्थित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम व गट शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने सर्व्हेक्षण केले. त्यात तेथे २८ मुले आढळून आले होते. ही मुले शालेय शिक्षण घेणारे असल्याचे देखील सिद्ध झाले.शिक्षण विभागामार्फत या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यांना समशेरपूर येथील शाळांमध्ये शिक्षणासाठी दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली. परंतु तांड्यापासून समशेरपूरची लांब असल्यामुळे हे मुले शाळेत येणार नाही. ही बाब देखील शिक्षण विभागाने विचारात घेतली. उपाययोजना करुनही मुलांचे शैक्षणिक नुकसान अटळ असल्याचेही शिक्षण विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखाना व्यवस्थापनाकडे या मुलांसाठी साखर शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने पाठपुरावा सुरू करण्यात आला. त्याची दखल घेत कारखान्यामार्फत साखर शाळाही सुरु करण्यात आल्या आहेत.या शाळेत सर्व्हेक्षणात आढळून आलेल्या २८ विद्यार्थ्यांसह नंतर आलेल्या चार विद्यार्थ्यांची देखील शिक्षणासाठी सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे या शाखर शाळेत एकुण ३२ विद्यार्थी दाखल झाले आहे, त्यात १७ मुली व १५ मुलांचा समावेश आहे. कारखाना व्यवस्थापनामार्फत करण्यात आलेल्या साखर शाळेमुळे या मुलांचे शैक्षणिक नुकसान टळल्याचे त्यांच्या पालकांकडून सांगण्यात येत आहे. शिवाय कारखाना व्यवस्थापनाच्या भूमिकेचेही पालकांनी कौतुक केले.साखर शाळेला शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींनी भेट देत गट शिक्षणाधिकारी डॉ. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विदार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेतला. यावेळी केंद्रप्रमुख एस.बी. वानखेडे, पी.बी. पाटील, डी.ए. पाटील, वैशाली बोरसे, नंदलाल गिरासे, कांतिलाल मराठे, शेतकी अधिकारी अरविंद पाटील साखर शाळेचे शिक्षक विशाल पाटील, कृष्णराव आदी उपस्थित होते.