सातपुड्यात वादळासह तुरळक पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:08 IST2020-05-14T10:08:08+5:302020-05-14T10:08:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : सातपुड्यातील धडगाव, मोलगी भागात बुधवारी दुपारी वादळासह तुरळक पाऊस झाला. यात अनेक घरांचे छत ...

Presence of sparse rain with storm in Satpuda | सातपुड्यात वादळासह तुरळक पावसाची हजेरी

सातपुड्यात वादळासह तुरळक पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : सातपुड्यातील धडगाव, मोलगी भागात बुधवारी दुपारी वादळासह तुरळक पाऊस झाला. यात अनेक घरांचे छत उडाले तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. या पावसामुळे आंब्यांचे व महू फुलांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणावर उकाडा होत आहे. तापमानही ४१ ते ४२ अंशावर स्थिर आहे. अशा वातावरणात सातपुड्यातील दऱ्याखोºयात मात्र पावसामुळे वातावरणात दिलासा मिळाला, मात्र यामुळे नुकसान देखील झाले. बुधवारी धडगाव व मोलगी भागात दुपारी अनेक भागात ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. दोन वाजेच्या सुमारास वादळ आले. सोबत पाऊस देखील होता. वादळाचा वेग अधीक असल्यामुळे अनेक ठिकाणी घरांचे छत उडाले. वृक्ष उन्मळून पडले होते.
सध्या सातपुड्यात कैऱ्यांचा हंगाम मोठ्या प्रमाणावर आहे. पक्व कैºयांचे आमसूल बनविण्याचेही काम सुरू आहे. अशात वादळ आल्याने आंब्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच यंदा मोहरचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पादन कमी येणार होते त्यात आता वादळामुळे नुकसान झाल्याचे चित्र आहे. आंब्यासह महू फुलांचेही या वादळात नुकसान झाल्याचे चित्र आहे.

Web Title: Presence of sparse rain with storm in Satpuda