शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या ठिकाणी मास्कला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा प्रसार रोखण्यात सॅनेटायझर आणि मास्क या दोन वस्तू सध्या गरजेच्या ठरत आहेत़ यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा प्रसार रोखण्यात सॅनेटायझर आणि मास्क या दोन वस्तू सध्या गरजेच्या ठरत आहेत़ यातील सॅनेटायझर्स बाजारात विक्री होत असले तरी एन-९५ हा सर्वात सुरक्षित मास्क मात्र उपलब्ध होत नसल्याची स्थिती जिल्ह्यात असल्याची माहिती समोर आली आहे़जिल्ह्यात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळून आला नसला तरी प्रशासन दक्षता घेत आहे़ यात प्रामुख्याने मास्क आणि सॅनेटायझर यांचा वापर कसा करावा याबाबत माहिती देणे सुरु आहे़ परंतू जिल्ह्यातील बहुतांश भागात कापडापासून तयार केलेले किंवा सर्जिकल मास्कची विक्री करण्यात येत आहे़ परंतू सर्वाधिक परिणामकारक अशा एन-९५ या मास्कची विक्री मात्र जिल्ह्यात होत नसल्याचे चित्र आहे़ शासनाकडूनही जिल्हा रुग्णालयात केवळ ३०० मास्क देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ यामुळे नागरिक सर्जिकल मास्क किंवा कापडी मास्कचा वापर करत आहेत़ हे मास्क गर्दीच्या ठिकाणी वापरणे योग्य असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने कळवले आहे़ दरम्यान निर्माण झालेल्या मास्कच्या टंचाईमागे काळाबाजार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ परंतू गेल्या काही दिवसात भारताने चीनमध्ये टी-९५ मास्क पाठवल्याने येथे त्याची टंचाई निर्माण झाल्याची माहिती होलसेल विक्रेते देत आहेत़ यामुळे इतर मास्कची विक्री वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे़काय आहे एन-९५सामान्यता बाजारात तीन लेयर असलेले सर्जिकल मास्क मिळतात़ हे वापरुन फेकता येतात़ एन-९५ हा शंभर टक्के सुरक्षा प्रदान करणारा व नियमित वापरात येणारा असल्याने त्याला मागणी आहे़ कापडी मास्क किंवा सर्जिकल मास्क हे गर्दीच्या ठिकाणी वापरणे योग्य असले तरी सर्वच डॉक्टर एन-९५ या मास्कलाच प्राधान्य देतात़ परंतू जिल्ह्यात हा मास्क उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आले आहे़ जिल्ह्यातील होलसेल व्यापाऱ्यांनी मागणी नोंदवूनही त्यांच्यापर्यंत मास्क येत नसल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान जिल्ह्यात परदेशातून तसेच उत्तरेकडील राज्यातून येणाºया नागरिकांची तपासणी करण्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हा शाखेने पुढाकार घेतला आहे़ रुग्ण संशयित आढळल्यास सदस्य डॉक्टर सिव्हीलला माहिती देऊन पुढील उपचारांसाठी रवाना करत आहेत़ आयएमएकडून जिल्ह्यात जागृती सुरु करण्यात आली आहे़