शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या पथकाला म्हसावद ग्रामस्थांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:45 IST

गुरूवारी दुपारी एक वाजता अचानक वीज वितरण कंपनीच्या चार पथकांनी घरगुती मीटर तपासणीसाठी गावात श्रीरामनगर भागात धाड टाकली. या ...

गुरूवारी दुपारी एक वाजता अचानक वीज वितरण कंपनीच्या चार पथकांनी घरगुती मीटर तपासणीसाठी गावात श्रीरामनगर भागात धाड टाकली. या पथकांमध्ये धुळे, जळगाव, मालेगाव व नंदुरबार येथील कर्मचारी असल्याचे सांगितले. चारही पथकात २० अधिकारी व कर्मचारी होते. त्यांच्या पथकात कोण कोण आहेत, नावांची विचारणा केली असता नावे सांगण्यास असमर्थता दर्शवली. कोरोना कालावधी सुरू असून पथकातील अनेकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. घरात महिला असताना विचारणा न करता घरात प्रवेश केला. परवानगी आहे का, ओळखपत्र दाखवा, ग्रामपंचायतची परवानगी घेतली का, पथकात स्थानिक अधिकारी का नाही, गावाबाहेर आकडे टाकून अवैध वीज वापरतात, तेथे कारवाई का करत नाहीत, अशी विचारणा केली. उपसरपंच चिंतामण लांडगे यांनी आधीच लोक कोरोना काळामुळे हैराण आहेत, निसर्गाचा कोप यामुळे कर्जबाजारीत बुडाला आहे, शेतात वेळेवर वीज नाही याबाबत विचारणा करून नियमानुसार कारवाई करा, असेही सांगितले.

दरम्यान, महिलावर्ग जास्त संतप्त झाल्या होत्या. ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केली व त्यास समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने वातावरण तापले. वातावरण तापते आहे हे पाहून पथकवाल्यांनी गावातून काढता पाय घेतला.