शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिने राहणार नवापुरातील पोल्ट्री व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:31 IST

यात सकीस्मा पोल्ट्रीतील १ लाख ७ हजार ७८९ तर जनता पोल्ट्रीमधील २२ हजार ९६५ पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. ...

यात सकीस्मा पोल्ट्रीतील १ लाख ७ हजार ७८९ तर जनता पोल्ट्रीमधील २२ हजार ९६५ पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. २४ पैकी २२ पोल्ट्री फार्ममधील पोल्ट्रीतील सर्व पक्षी नष्ट करण्यात आले. सहा दिवसात आतापर्यंत ५ लाख १० हजार २१० पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. तर १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नष्ट केली, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा वगळून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे दिसून येत आहे. देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून त्यातील नवापूर हे बर्ड फ्लूचे मुख्य केंद्र बनले आहे. आर्थिक उलाढाल काहीअंशी मंदावली आहे. नवापुरात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन सुरू आहे. यासाठी मोठी यंत्रणा कमाल लागली आहे. पाच ते दहा जेसीबी मशीन, १५ ते २० ट्रॅक्टर, टेम्पो, ॲम्बुलन्स, तसेच कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी चार ते पाच स्कूल बस तसेच ४० ते ५० शासकीय वाहने, नगरपालिकेचे आरोग्य विभागाची वाहतूक यंत्रणा या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. महसूल पशुसंवर्धन, पोलीस, नगरपालिका पंचायत समिती, आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी बर्ड फ्लू नियंत्रणासाठी कार्यरत आहेत. सर्व पोल्ट्रीतील पक्ष्यांचा नाश झाल्यानंतर निर्जंतुकीकरण करण्यात येईल, अशी माहिती पशुसंवर्धन प्रादेशिक सहआयुक्त बाबूराव नरवाडे यांनी दिली.

शनिवारी अनेक मोठ्या पोल्ट्रीतील कोल्ड स्टोरेजमध्ये साठवलेली लाखो अंडी नाश करण्यात येणार आहेत. तसेच बर्ड फ्लू ग्रस्त पोल्ट्रीतील लाखो पक्षी नष्ट करण्याचे किलिंग ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. आठवड्याभरातील किलिंग ऑपरेशनमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, प्रांताधिकारी वसुमना पंत व नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या उत्तम नियोजनामुळे बर्ड फ्लू नियंत्रणाचे काम सुरळीत सुरू आहे. शिश पोल्ट्रीचे मालक यांच्या पोल्ट्रीच्या झालेल्या नुकसानीची माहिती देताना शिश टिमोल भावूक झाले.

तीन महिने पोल्ट्री व्यवसाय बंद राहणार

साधारणतः ९० दिवसांपर्यंत नवापुरातील संपूर्ण पोल्ट्री व्यवसाय बंद राहणार आहे. त्यादरम्यान एका पोल्ट्रीतील साधारणतः २५ ते ३० असे एकूण हजारो मजुरांचा पोटापाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे. नवापूर शहरात बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शहरातील चिकन व अंडी विक्रीवर बंदी घातल्याने शेकडो छोटे-मोठे व्यावसायिकांवर बेराजगारीचे संकट उभे टाकले आहे. आधीच कोरोनाने हैराण झालेल्या छोट्या व्यापारांना बर्ड फ्लूचे या नवीन आलेल्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.