कुंभार समाजातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:35 PM2020-02-19T12:35:59+5:302020-02-19T12:36:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेतर्फे शहादा शहरातील नगर परिषद मराठी शाळा क्रमांक ११ मध्ये ...

The potter community distributes educational materials to students | कुंभार समाजातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कुंभार समाजातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेतर्फे शहादा शहरातील नगर परिषद मराठी शाळा क्रमांक ११ मध्ये मान्यवरांच्या हस्ते गरजू मुलींना ड्रेस वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हृदयेश चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा सचिव हिरालाल कुंभार, जिल्हा सदस्य खगेंद्र मोहन कुंभार, प्रल्हाद कुंभार, दीपक पुनमचंद कुंभार, सामाजिक कार्यकर्ते नागो मकरंदे, मुख्याध्यापक राजाराम रावताळे, वर्षा मगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी शाळा हळूहळू कात टाकत असून, डिजिटल क्रांतीमुळे शाळेत विद्यार्थी आनंदाने व उत्साहाने येत असून, पटसंख्यादेखील वाढत आहे. कदाचित याच शाळेतून एखादा विद्यार्थी उच्च पदावर पोहोचून शाळेचे व आपल्या परिसराचे नाव यशोशिखरावर नेऊ शकतो. फक्त या हिऱ्यांना पैलू पाडण्याची गरज आहे, असे मत चव्हाण यांनी मांडले. तसेच हिरालाल कुंभार यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, खेळ, अभ्यास, वक्तशीरपणा, सार्वजनिक स्वच्छता, टापटीप पणा यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौशल सूर्यवंशी तर आभार राजू डुडवे यांनी मानले. कार्यक्रास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Web Title: The potter community distributes educational materials to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.