शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

म्हसावद-सुलतानपूर रस्तावर खड्ड्यांमुळे वाहतूक ठरतेय धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद ते सुलवाडा-सुलतानपूर रस्ता वाहनचालकांसाठी धोकेदायक ठरत असून, डांबरीकरण असलेला रस्ता सहा ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद ते सुलवाडा-सुलतानपूर रस्ता वाहनचालकांसाठी धोकेदायक ठरत असून, डांबरीकरण असलेला रस्ता सहा महिन्यापासून पूर्णत: उखडून खड्ड्यांचा झाला आहे. परिसरातील लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्ता जीवघेणा ठरत    आहे.हा रस्ता मध्य प्रदेश राज्याकडे जाण्यासाठी एकमेव असल्याने परिसरातील नागरिकांसाठी सोयीचा आहे. या रस्त्याचे रूंदीकरण होणार असले तरी एक-दीड वर्षापासून घोडे अडले कोठे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. किशोर पाटील यांनी या रस्त्याच्या दुर्दशेबाबत खासदार डॉ.हिना गावित, आमदार राजेश पाडवी, जि. प. सदस्य यांच्याकडे अनेकवेळा तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. हा रस्ता चार किलोमीटरचा असला तरी पार करण्यासाठी अर्धा तासाचा कालावधी लागतो इतकी दुर्दशा झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे झाल्याने           ऊस, केळी, पपईची वाहतूक           करणारी वाहने नेताना वाहन चालकाला जीव धोक्यात टाकून जावे लागते. दर १५ दिवसांत एक वाहन उलटून अपघात होऊन वाहनमालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. डांबरीकरण नावालाच उरले असून, पूर्णतः खडी उखडून गेली आहे. रस्त्यावरील भराव अनेक ठिकाणी खचल्याने उंचवटे तयार झाले आहेत. चारही फरशींवरील भराव खचला आहे. वळणावरील रस्त्यांच्या बाजूची झाडे वाढली आहेत. परिणामी समोरून येणारे वाहन दिसत नाही. हा रस्ता टवळाई, गणोर, अंबापूर, आडगाव व म्हसावद परिसरातील गावांना सोयीचा असून, वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्याची दुरुस्ती, रुंदीकरण त्वरित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. किशोर पाटील यांच्यासह सुलवाडा, सुलतानपूरचे सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी केली असून, दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.