पोलिसांची दारु विक्री प्रकरणी अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST2021-05-19T04:32:14+5:302021-05-19T04:32:14+5:30

शहरातील उपनगर पोलिसांनी एका हॉटेलवर कारवाई करून दारुसाठा जप्त केला होता. मात्र, तीच ...

Police submit report on liquor sale case | पोलिसांची दारु विक्री प्रकरणी अहवाल सादर

पोलिसांची दारु विक्री प्रकरणी अहवाल सादर

शहरातील उपनगर पोलिसांनी एका हॉटेलवर कारवाई करून दारुसाठा जप्त केला होता. मात्र, तीच दारू दुसऱ्या एका हॉटेलला विक्री झाल्याचे दुसऱ्या छाप्यानंतर निदर्शनास आले. हे प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गांभीर्याने घेतले. संबंधित अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्याची तत्काळ तात्पुरती मुख्यालयात बदली करून स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आदेश दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हा अहवाल गोपनीय असल्याने अहवालाबाबतचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. यासंदर्भात आता पुढे काय कारवाई होते, याकडे पोलीस दलासह जनतेचे लक्ष लागून आहे.

Web Title: Police submit report on liquor sale case