शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमामुळे ‘जीना मरना तेरे संग’ सांगून पळालेल्यांना पोलीसांनी दाखवला रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन असल्याने प्रेमवीरांना केवळ विरह सहन करुन जगावे लागत आहे़ परंतू या विरहावर मात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन असल्याने प्रेमवीरांना केवळ विरह सहन करुन जगावे लागत आहे़ परंतू या विरहावर मात करत थेट राज्याच्या सीमा ओलांडून जात तेथे विवाह करुन परत येणाऱ्या ‘सज्ञान’ जोडप्याला पोलीसांनी लॉकडाऊन मोडल्याचा रंग दाखवत मास्क न लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे़ सोमवारी शहर पोलीस ठाण्यात हे जोडपे आले होते़शहरातील नवनाथ नगर भागात २१ व १८ वर्षीय युवतीत गेल्या काही दिवसांपासून प्रेम बहरले होते़ यातून मग तुझ्याशिवाय जगूच शकत नाही़ ही भावना अधिक वाढत गेल्याने १५ मे चा मुहूर्त साधून दोघांनीही घरातून पलायन केले़ मोटारसायकलने आधी घराबाहेर आणि नंतर नंदुरबार शहराबाहेर पडलेल्या दोघांनी गुजरात राज्याचा रस्ता धरत निझरकडे जाणे पसंत केले़ ग्रामीण भागातील विविध रस्ते धुंडाळून अवघ्या काही अंतरावर असलेल्या निझर पोहोचल्यानंतर दोघांनी तेथे ‘जुगाड’ करुन विवाह सोहळा उरकून घेतला होता़ लॉकडाऊनमुळे तेथे राहणे शक्य नसल्याने दोघेही अवघ्या तीन तासातच परतही आले़ घरी आल्यानंतर दोघांच्या कुटूंबियांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी दोघांना दूर सारण्याचा प्रयत्नही करुन पाहिला़ परंतू ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने दोन्ही कुटूंबांनी अखेर पोलीस ठाणे गाठून दाद मागितली़ परंतू दोघेही सज्ञान असल्याचा निर्वाळा देत पोलीसांनी कारवाईबाबत असमर्थता दर्शवली़ परंतू लॉकडाऊनकाळात मोटारसायकलने महाराष्ट्र ते गुजरात असा दोन वेळा विनापरवाना प्रवास करुन कायद्याचे उल्लंघन करणे आणि पोलीस ठाण्यात मास्कविना फिरताना प्रियकर आणि प्रेयसी आढळून आल्याने त्यांच्यावर कलम २६८, २६९ व २९० प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे़ याबाबत पोलीस नाईक नरेंद्र देवराज यांनी फिर्याद दिली असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बिºहाडे करत आहेत़कायद्याने दोघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतरही यातही प्रेमाची जीत म्हणून दोघेही सोबत राहणार या हट्टावर अडून बसल्याने कुटूंबियांनीही आवरते घेत दोघांना मोकळे केले़