शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

२५ वा लग्नवाढदिवस २५ वृक्षांचे रोपण व संगोपन संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

सध्या कोरोना संक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपल्या माणसाला उपचार मिळविण्यासाठी तसेच कोरोनाचा सामना करत ...

सध्या कोरोना संक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपल्या माणसाला उपचार मिळविण्यासाठी तसेच कोरोनाचा सामना करत असताना नागरिक सैरावैरा धावताना दिसून येत आहे. संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनेक जवळच्या रुग्णांना बेड न मिळाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने जमदाडे यांनी लग्न वाढदिवस साजरा न करता त्यादिवशी २५ वृक्षांचे रोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प घेतला होता. त्यानुसार बुधवारी वृक्षारोपण करण्यात आले.

शहादा शहरातील द्वारकाधीश नगरमध्ये राहणारे दीपक जमदाडे २५ वर्षांपासून वनविभागात कार्यरत आहेत. वनविभागात असल्यानेच त्यांचे वृक्षांची घट्ट नाते आहे. त्यामुळे पत्नी मंगला जमदाडे व कुटुंबीयांनी वेगळ्या पद्धतीने लग्न वाढदिवस साजरा करण्याच्या निर्णय घेत, द्वारकाधीश नगरवासीयांच्या मदतीने बुधवारी खुल्या जागेत शास्त्रोक्त पद्धतीने २५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यात पिंपळ, वड, उंबर, शिवण, कांचन, निम, रिठा, बेल, शीमल, मोहा, जांभूळ आदी जातींच्या रोपांच्या समावेश आहे.

वृक्षलागवड ही काळाची गरज बनली आहे. स्वच्छ शुद्ध व ताजी हवा राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाचे आहेत. मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आणि प्रदूषणामुळे निसर्गाच्या मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. या सर्वांमुळे हवामानाच्या लहरीपणा दिसत आहे. त्याचा परिणाम मानवाला दिसू लागला आहे म्हणून वृक्षलागवड व पर्यावरणाच्या समतोल राखण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे आवाहन जमदाडे यांनी उपस्थितांना केले.

वृक्षरोपणाप्रसंगी विमलबाई जमदाडे, महेंद्र जमदाडे, जितेंद्र जमदाडे, गौतम जमदाडे, नगरसेविका विद्या जमदाडे, कविता जमदाडे, सुनीता जमदाडे, सुपडू खेडकर, वनपाल प्रवीण वाघ, नंदराव कोते, राजेंद्र साळुंखे, किरण भावसार, मनोज पाटील, के. बी. राजपूत, सुरेश ढोले, उखा जाधव उपस्थित होते.

ऑक्सिजनच्या तुटवडा निर्माण झाल्यानंतर आता सोशल मीडियावर सर्वांकडे झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावण्याशिवाय पर्याय नाही अशी पोकळ चर्चा सुरू असताना फक्त संदेश न देता प्रत्यक्ष कृतीतून या जोडप्याने झाडांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रतिक्रिया

सध्याच्या परिस्थितीत झाडांचे महत्त्व लक्षात घेता जास्त ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे रोपण व संगोपन करण्याच्या मानस होता तो आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण केला.

- दीपक जमदाडे - वनपाल वनविभाग, शहादा