शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा येथे लसीकरण सप्ताह राबविण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

कोठार : तळोदा शहर व परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सप्ताह राबविण्याबाबत नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी यांनी ...

कोठार : तळोदा शहर व परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सप्ताह राबविण्याबाबत नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने शहरात सात दिवसांचा सप्ताह राबविण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

जिल्हाभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, यावर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय सध्यातरी उपलब्ध असल्याने व तळोदा नगर परिषद हद्दीत लसीकरण कार्यक्रमाला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने नगर परिषदेमार्फत शहरातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर तळाेदा शहरात लसीकरण सप्ताह राबविण्याची मागणी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी डाॅ. भारुड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

या निवेदनात नागरिकांना सोयीचे ठरणारे स्थळ सुचवून लसीकरणासाठी पथकांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या मागणीची दखल घेत अपर जिल्हाधिकारी यांनी तळोदा पालिकेला पालिका हद्दीत सप्ताह राबविण्याबाबत सूचित केले आहे. त्या अनुषंगाने पालिकेकडून आरोग्य विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला असून, हा सप्ताह यशस्वीरित्या राबविण्याकरिता आवश्यक तेवढ्या लसी, वैद्यकीय अधिकारी, रुग्णसेवक, सेविका व आरोग्य कर्मचारी देण्याची विनंती करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत २७ एप्रिल रोजी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, ५ आणि ७ याठिकाणी, २८ रोजी भाईसाहेब गो. हू. महाजन हायस्कूल, २९ रोजी जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, ३० एप्रिल रोजी संत सावता माळी भवन, ३ मे रोजी शेठ के. डी. हायस्कूल, ४ मे रोजी जैनवाडी तर ५ मे रोजी माळी समाज मंगल कार्यालय याठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत लसीकरण शिबिर होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.