शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्याने केले अनेक वाहनांची नादुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : कोळदा ते सेंधवा या दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हेच काम प्रकाशा ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : कोळदा ते सेंधवा या दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हेच काम प्रकाशा ते तळोदा चौफुलीजवळ अपूर्णावस्थेत असल्याने गेल्या सहा महिन्यापासून वाहनधारकाना अडचणीचे ठरू पाहात आहे. सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे याठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे अवजड वाहनाचा मागील भाग टेकला जात असल्याने वाहन नादुरूस्त होत आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
याबाबत असे की, कोळदा ते सेंधवा या दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र कोरीट चौफुली ते तळोदा चौफुलीपर्यंतचा मार्ग खडतर झाला असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, तळोदा चौफुलीवरी पेट्रोल पंपाजवळ संबंधित ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला असून, या खोदलेल्या रस्त्यावर दगड गोटे टाकून ठेवले आहेत. मात्र ज्या ठिकाणी दगड व मुरूम टाकले आहे त्यावर जेसीबी अथवा रोटलदेखील फिरविण्यात आला नसल्याने वाहनधारक पर्यायी मार्गावरून जात आहेत. परंतु या पर्यायी रस्त्यावरच खड्डा तयार झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. मध्यंतरी पावसाळा सुरू झाल्याने हा खड्डा अधिक पसरल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
या मार्गावरून वाहन काढताना मागील भाग खड्ड्यास टेकला जात असल्याने वाहनाचे नुकसान होत असून, या खड्ड्यात वाहन फसत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून या मार्गावरील अपूर्णावस्थेत असलेले काम त्वरित पूर्ण करून वाहनधारकांना सोयीचे करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या ठिकाणी पोलिसांतर्फे बॅरिकेट्सदेखील लावण्यात आले आहे. याठिकाणी वेळोवेळी होणाºया ट्रॅफिक जाममुळे पोलीस कर्मचारीही वैतागले असून, संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
या समस्येबाबत संबंधित ठेकेदाराला वारंवार सांगूनही दुर्लक्ष करीत असल्याने गेल्या सहा महिन्यापासून वाहनधारक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकाºयांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देवून या मार्गावरील अपूर्णावस्थेत असलेले काम त्वरित मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.