नंदुरबारातील विवाहितचा आंध्रप्रदेशात छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 12:10 IST2020-12-21T12:10:37+5:302020-12-21T12:10:49+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहरातील विवाहितेचा तिच्या आंध्रप्रदेशातील सासरी पैशांसाठी छळ केल्याची घटना घडली. याबाबत पाच जणांविरुद्ध गुन्हा ...

Persecution of a married woman from Nandurbar in Andhra Pradesh | नंदुरबारातील विवाहितचा आंध्रप्रदेशात छळ

नंदुरबारातील विवाहितचा आंध्रप्रदेशात छळ

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  शहरातील विवाहितेचा तिच्या आंध्रप्रदेशातील सासरी पैशांसाठी छळ केल्याची घटना घडली. याबाबत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल    करण्यात आला आहे. दरम्यान, संशयीतांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबारातील एमएल टाऊन परिसरात राहणाऱ्या पूनम जितेश धारीवाल यांचा विवाह २०१५ मध्ये आंध्रप्रदेशातील ताडपत्री, जिल्हा अनंतपूर येथील जितेश धारीवाल यांच्याशी झाला होता. विवाह झाल्यापासून त्यांना सासरची मंडळी त्रास देत होती. त्यांच्याकडील सर्व सोने काढून घेत विकून दिले. त्यानंतर वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यासाठी शिविगाळ व मारहाण करण्यात येत होती. त्याला कंटाळून पूनम धारीवाल यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 
त्यांच्या फिर्यादीवरून जितेश कांतीलाल धारीवाल, कांतीलाल   रघुनाथ धारीवाल, इंद्रदेवी कांतीलाल धारीवाल, भरत कांतीलाल धारीवाल, ममता भरत धारीवाल यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार राजेंद्र दाभाडे करीत आहे. 

Web Title: Persecution of a married woman from Nandurbar in Andhra Pradesh