नंदुरबारात शांतता कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 13:04 IST2020-08-19T13:03:18+5:302020-08-19T13:04:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने मंडळांनी साध्या पद्धतीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा ...

Peace committee meeting in Nandurbar | नंदुरबारात शांतता कमिटीची बैठक

नंदुरबारात शांतता कमिटीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने मंडळांनी साध्या पद्धतीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी केले़ सोमवारी शहरात आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते़
शहरातील जैन दादावाडी हॉलमध्ये ही बैठक घेण्यात आली़ यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोेलीस अधिकारी रमेश पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस उपअधिक्षक सिताराम गायकवाड, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य आणि विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते़ बैठकीत आगामी गणेशोत्सवावर चर्चा करण्यात आली़
बैठकीत महेंद्र पंडीत यांनी सांगितले की, यंदाच्या गणेशोत्सव साध्या पद्धतीने मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन साजरा करावा, कोरोनाची परिस्थिती पाहता मंडळांनी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे़ मंडळांनी उत्सवासाठी केला जाणारा खर्च कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिल्यास आदर्श निर्माण होणार आहे़ मंडळांनी योग्य तो निर्णय घेऊन मूर्ती स्थापना करावी़ प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी केले़ या बैठकीत काही गणेश मंडळांनी यावर्षी उत्सव रद्द करणार असल्याचे जाहिर केले़ त्या मंडळांकडून स्वतंत्र पत्र पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांना देण्यात आले़ शांतता कमिटीचे सदस्यांनी मनोगत व्यक्त केले़

Web Title: Peace committee meeting in Nandurbar