नवीन कक्षामुळे रुग्णांचा आला जीवात जीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:11 IST2020-06-30T12:11:01+5:302020-06-30T12:11:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षातील वाढत्या अनागोंदी आणि तक्रारी लक्षात खामगाव रस्त्यावरील वसतिगृहात नवीन कोवीड ...

Patients come alive due to new orbit! | नवीन कक्षामुळे रुग्णांचा आला जीवात जीव!

नवीन कक्षामुळे रुग्णांचा आला जीवात जीव!

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षातील वाढत्या अनागोंदी आणि तक्रारी लक्षात खामगाव रस्त्यावरील वसतिगृहात नवीन कोवीड कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवात जीव आला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षातील स्वच्छता आणि इतर बाबी मात्र जैसे थे आहेत.
खामगाव रस्त्यावरील एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील वसतिगृहात नवीन कोवीड कक्ष स्थापन करण्यात आला आहे. वसतिगृहाची नवीन इमारत असल्यामुळे अवस्था चांगली आहे. स्वच्छतागृहे, स्रानगृह यांची अवस्था चांगली आहे. परिसर मोकळा व विस्तीर्ण असल्यामुळे रुग्णांच्या मनस्थितीवरही सकारात्मक परिणाम होत आहे. या ठिकाणी कमी लक्षणे असलेल्या ४० रुग्णांना ठेवण्यात आले आहे.
दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात जास्त लक्षणे असलेले आणि ५५ वर्षापेक्षा अधीक वय असलेल्या रुग्णांना ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी तक्रारीनंतर मात्र दोन दिवस स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले. नंतर मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे.
या ठिकाणी स्रानगृहच नसल्यामुळे समस्या आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याचा वापर देखील सर्वांना एकाच ठिकाणी करावा लागत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Patients come alive due to new orbit!