शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पपई रोपे निघाली नर प्रजातीची, म्हसावद येथील शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

याबाबत वृत्त असे की, एप्रिल महिन्यात म्हसावद येथील छोटूलाल लामगे व दौलत ठाकरे या शेतकऱ्यांनी बार्शी (ता. परांडा, जि. ...

याबाबत वृत्त असे की, एप्रिल महिन्यात म्हसावद येथील छोटूलाल लामगे व दौलत ठाकरे या शेतकऱ्यांनी बार्शी (ता. परांडा, जि. उस्मानाबाद) येथील परमेश्वर हनुमंत बानगुडे यांनी जे-१५ या प्रजातीच्या सहा हजार रोपांची साडेसहा एकर शेतात लागवड केली. रोपे देताना पपई पीक खरेदी करणे, चांगला भाव देणे, असे आमिषही दाखवण्यात आले. सहा हजार रोपांचे बिल निम्मे रोखीने, तर बाकी ऑनलाईन देण्यात आले. एप्रिल महिन्यात लागवड केलेल्या पपई पिकास औषधी, खते, मजुरी व इतर खर्च केला. पपईच्या रोपांची वाढ चांगली होऊन ती चार ते पाच फुटापर्यंत वाढली. मात्र फळधारणा न होता त्यांना तुरे निघत असल्याने ९० टक्के रोपे नर प्रजातीची असल्याचे आढळून आले. संबंधितांना शेतकऱ्यांनी शेतातील पिकाचे फोटो पाठवून संपर्क साधला असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. शेवटी हताश होऊन शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर मारून पपईचे पीक काढून टाकले. यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत म्हसावद पोलिसांत तक्रार केली असून, पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी दहा दिवसांची सवलत दिली आहे. शेतकऱ्यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.