शहादा येथे १०० बेडचे ऑक्सिजन सेंटर कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST2021-04-24T04:30:43+5:302021-04-24T04:30:43+5:30

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार शहादा तालुक्यातील व परिसरातील कोविड रुग्णांना सुविधा मिळावी यासाठी मोहिदे त.श. शिवारात असलेल्या अनुसूचित जमाती वसतिगृहात ...

Oxygen center of 100 beds at Shahada | शहादा येथे १०० बेडचे ऑक्सिजन सेंटर कार्यान्वित

शहादा येथे १०० बेडचे ऑक्सिजन सेंटर कार्यान्वित

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार शहादा तालुक्यातील व परिसरातील कोविड रुग्णांना सुविधा मिळावी यासाठी मोहिदे त.श. शिवारात असलेल्या अनुसूचित जमाती वसतिगृहात शंभर बेड क्षमतेचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी स्वतंत्र ट्रान्सफार्मर वीज वितरण कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लान्ट सुरू झाल्याने या कोविड सेंटरचे रीतसर उद्घाटन येथे नियुक्त परिचारिका श्रीमती मनीषा जयसिंग पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी यांच्यासह महसूल, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहाद्यात शंभर बेडचे ऑक्सिजनयुक्त शासकीय कोविड सेंटर सुरू झाल्याने अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना बाहेरगावी न जाता इथेच उपचार घेणे सोयीचे ठरणार असल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Oxygen center of 100 beds at Shahada