दोन हजारपैकी फक्त २० शाळांनी केले स्वयंपूर्ण मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:29+5:302021-04-06T04:29:29+5:30

शैक्षणिक, भौतिक व संस्थात्मक गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्या शिक्षण विभागामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून शाळा सिद्धी हा उपक्रम राबविला जात आहे. ...

Out of 2,000, only 20 schools conducted self-assessment | दोन हजारपैकी फक्त २० शाळांनी केले स्वयंपूर्ण मूल्यमापन

दोन हजारपैकी फक्त २० शाळांनी केले स्वयंपूर्ण मूल्यमापन

शैक्षणिक, भौतिक व संस्थात्मक गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्या शिक्षण विभागामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून शाळा सिद्धी हा उपक्रम राबविला जात आहे. यंदाच्या म्हणजे २०२० - २१ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा दोन हजार सात शाळांपैको केवळ २० शाळांनी हा उपक्रम पूर्ण केला आहे. ५९ शाळांची माहिती विकसित असल्याचे पत्रात नमूद केले आहे. तर एक हजार ९५९ शाळांनी हा उपक्रमच हाती घेतला नसल्याचे शिक्षण विभागाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. वास्तविक केंद्र शासनाच्या शाळा सिद्धी उपक्रमाअंतर्गत संबंधित शाळांची गुणवत्ता, संस्थात्मक, भौतिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यातून निश्चितच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होत असते. परंतु संपूर्ण जिल्ह्यात केवळ चार टक्के शाळांनी हे कार्य पूर्ण केले आहे. उर्वरित शाळांनी उदासीन धोरण घेतल्याचे चित्र आहे.

अक्कलकुवा तालुक्यात १२ शाळांनी, नवापूर पाच शाळा, नंदुरबार, धडगाव तालुक्यात प्रत्येकी दोन शाळा, तर शहादा व तळोदा तालुक्यातील एकाही शाळेने हा उपक्रम पूर्ण केलेला नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी पाठवलेल्या पत्रात दिली आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी तातडीने माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Out of 2,000, only 20 schools conducted self-assessment