शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पंचनामे सुरुच ठेवण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 2 हजार 400 हेक्टर क्षेत्रावरचे पंचनामे कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या पथकाने पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 2 हजार 400 हेक्टर क्षेत्रावरचे पंचनामे कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या पथकाने पूर्ण केले आहेत़ यानंतरही जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने  पंचनामे सुरुच ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिले असून त्यानुसार कारवाई सुरु झाली आह़े जिल्ह्यात गेल्या दोन आठवडय़ात वेळोवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली आह़े अवकाळीची मार बसल्याने कापूस, ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबीन यासह विविध पिकांचे नुकसानीमुळे शेतक:यांना मोठा आर्थिक फटका बसला आह़े शासनाच्या आदेशानुसार महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे 700 अधिकारी व कर्मचारी या पिकांचे पंचनामे करण्यासाठी गेल्या आठवडय़ापासून कामाला लागले होत़े यातून बुधवार सायंकाळर्पयत 2 हजार 400 हेक्टरवरच्या शेतीपिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर गुरुवारी सकाळपासून अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती़ यामुळे या भागात पथके पुन्हा रवाना करण्यात आली आह़े या पंचनाम्यांचा अहवाल शुक्रवारी किंवा शनिवारी पूर्ण होऊन सोमवारी जिल्हाधिकारी यांना सादर होणार आह़े यानंतर पुढील कारवाई शक्य आह़े 

बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील 881 हेक्टर क्षेत्रचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होत़े यानुसार नंदुरबार 335, नवापुर 160, शहादा 284़30, धडगाव 60 तर अक्कलकुवा तालुक्यात 42 हेक्टरवर पंचनामे पूर्ण झाले आहेत़ जिल्ह्यात आतार्पयत 2 हजार 437 हेक्टर क्षेत्रात पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ यात नंदुरबार 45, नवापुर 212, शहादा 960, धडगाव 943 तर अक्कलकुवा तालुक्यात 275 हेक्टर क्षेत्रात पंचनामे करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े शेतकरी निहाय संख्येनुसार जिल्ह्यात बुधवार सायंकाळर्पयत नंदुरबार 20, नवापुर 781, शहादा 1 हजार 421, धडगाव 2 हजार 54, तर अक्कलकुवा तालुक्यात 640 अशा एकूण 4 हजार 916 शेतक:यांचे पंचनामे पूर्ण झाल़े जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नुकसान झाले असताना केवळ पाचच तालुक्यात पंचनामे करण्यात आल्याचे शासकीय अहवालातून समोर आले आह़े यामुळे तळोदा तालुक्यात नुकसान होऊनही शेतकरी वंचित असल्याचे स्पष्ट होत आह़े 

दरम्यान जिल्ह्यातील विविध भागात पुणे येथून कृषी आयुक्त यांनी पाठवलेल्या अधिका:यांच्या पथकाने पाहणी करुन माहिती घेतली़ नंदुरबारसह दुर्गम भागातील विविध ठिकाणी अधिका:यांनी भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेतला होता़ अधिकारी शेतक:यांसोबत संवाद साधून माहिती घेत होत़े हे पथक सायंकाळर्पयत जिल्ह्यात भेटी देत असल्याची माहिती आह़े