शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

अफ्रोज अहमद यांच्या बैठकीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांच्या विस्थापितांचे फार मोठे नुकसान करणाऱ्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन करणारे नर्मदा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांच्या विस्थापितांचे फार मोठे नुकसान करणाऱ्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन करणारे नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे निवृत्त संचालक अफरोज अहमद यांच्याकडे कुठलेही संविधानीक पद नसताना त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेली बैठक तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहेजिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात आशय असा : अफरोज अहमद जे पूर्वीचे नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे संचालक होते व सध्या ते निवृत्त असून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल आहेत असे अफरोज अहमद नंदुरबार मध्ये येत आहेत व त्यांची आपल्यासमवेत सरदार सरोवर प्रकल्पाची व इतर मुद्यांवर बैठक ६ आॅक्टोबर रोजी होणार आहे हे वृत्त धक्कादायकच आहे. अफरोज अहमद सध्या कोणत्या पदावर आहेत? ते कोणत्या अधिकाराने नंदुरबार मध्ये येत आहेत? नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे संचालक व नंतर सदस्य असताना त्यांनी अनेक खोटी शपथपत्रे सादर केली आहेत, ज्याच्यामुळे महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांच्या विस्थापितांचे फार मोठे नुकसान झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन झाले आहे. पुनर्वसन व पर्यावरण संबंधी कायदा , राज्यस्तरीय धोरणे, नीती व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन वारंवार झालेले आहे. हे अनेक प्रकारे साबितही झाले आहे. अफरोज अहमद महाराष्ट्राचे सल्लागार असू शकत नाहीत. त्यांचे ते पद रद्द झाल्याचेही आम्हाला कळले आहे. तसे नसेल तर कृपया आपण ही स्पष्टता करावी की, त्यांची डिग्री फर्जी असल्याबद्दल, अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांच्यावर मध्य प्रदेश उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल असताना, त्यांच्यासमवेत सरदार सरोवरसंदर्भात अधिकारी बैठक कसे करू शकतात? त्यांच्याशी चर्चा व संवाद करणे हे कितपत योग्य आहे? व त्यांना सल्लागाराचे पदही महाराष्ट्र सरकार देऊ शकते का? असे होत असल्यास ते चुकीचे आहे. विस्थापितांच्या दृष्टीनेही अन्यायाचे आहे, आम्ही याचा निषेध करतो व आपण ही बैठक तत्काळ रद्द करावी अशी आम्ही मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. निवेदनावर मेधा पाटकर, नुरजी वसावे, पुन्या वसावे, चेतन साळवे ओरसिंग पटले लतिका राजपूत यांच्या स्वाक्षºया आहेत.दरम्यान, गेल्या वेळी अहमद यांना सक्रीट हाऊसवर विरोध केल्याप्रकरणी नर्मदा आंदोलक कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.