शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सेतू अभ्यासक्रम बालकांसाठी नवसंजीवनी, शिक्षण विभागाच्या वेबिनारमध्ये मान्यवरांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST

कोविडमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ४५ ...

कोविडमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ४५ दिवसीय सेतू अभ्यासक्रमाबाबत जिल्ह्यातील शिक्षकांना असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आणि नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनारचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. दुर्गम भागासाठी सेतू अभ्यासक्रम एक वरदानच असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सेतूसोबत स्थानिक सृजनासह गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मार्गदर्शन करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या उपसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी कोरोनाच्या काळात कृतीपूर्ण आनंददायी वातावरणाची निर्मिती साध्य करणारा अभ्यासक्रम म्हणजे सेतू अभ्यासक्रम असल्याचे सांगून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा अभ्यास पोहोचवून त्यांच्या अध्ययनाची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली.

विपरीत परिस्थितीत १०० टक्के मुलांची पायाभरणी करून गुणवत्तेचा मार्ग खुला करणारा अभ्यासक्रम असल्याचे मत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या उपसंचालिका डॉ. नेहा बेलसरे यांनी मांडले. ‘सेतू’ हा सर्वांनाच मुलांच्या जवळ आणण्याचा मार्ग आहे, असे प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबादच्या अधिव्याख्याता निलोफर पटेल यांनी सांगितले. सेतू म्हणजे आत्मविश्वास ही गुणवत्तेच्या भाव-बंधाची जोडणी होय, असे उद्‌गार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबारचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी काढले.

नंदुरबारचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला सोप्या पद्धतीने पुढे नेणारी बांधणी म्हणजे सेतू अभ्यासक्रम असून ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ केवळ नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांनाच नव्हे, तर राज्यातील सहा हजार १७४ शिक्षकांना झालेला आहे, असे सांगितले.

या वेबिनारचे समन्वयक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली. विभागप्रमुख वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. वनमाला पवार यांनी, तर आभार नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी मानले. मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, सुनील परदेशी यांचे सहकार्य लाभले.