शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चार संवर्गातील ४५१ सहकारी संस्थांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

दरम्यान डिसेंबर २०१९ मध्ये मुदत संपलेल्या एकूण १२८ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. यात क दर्जाच्या १४ तर ड ...

दरम्यान डिसेंबर २०१९ मध्ये मुदत संपलेल्या एकूण १२८ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. यात क दर्जाच्या १४ तर ड दर्जाच्या ११४ सहकारी संस्थांचा समावेश आहे. कोरोनामुळे जानेवारी २०२० ते मार्च २०२० या काळात मुदत संपलेल्या एकूण१७५ संस्था निवडणूक कार्यक्रमास पात्र होत्या. यात ब दर्जाच्या १०५, क दर्जाच्या ३६, ड दर्जाच्या ३४ संस्था समाविष्ट आहेत.

जिल्ह्यात एप्रिल २०२० ते जून २०२० या काळात ४६ संस्थांची मुदत संपली होती. यात अ दर्जा असलेली एक, ब दर्जाच्या १८, क दर्जाच्या १३, तर ड दर्जा असलेल्या एकूण ४६ संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात एकूण ३७ संस्थांची मुदत संपली होती. यात अ दर्जाची एक, ब दर्जा असलेल्या २८, क दर्जाच्या ५ तर ड संवर्गातील ३ संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या काळात ३५ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र ठरणार होत्या. यात ब दर्जा प्राप्त २१, क दर्जा प्राप्त आठ दर ड दर्जा प्राप्त असलेल्या ६ संस्थांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात निवडणुकीस पात्र असलेल्या सर्वच सहकारी संस्थांवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काळात अ दर्जा असलेल्या दोन, ब दर्जाच्या १८५, क दर्जाच्या ९४ तर ड दर्जाच्या १७० संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रामुख्याने गृहनिर्माण, विविध कार्यकारी संस्था, साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, दुग्धोत्पादन सोसायट्या, विविध कार्यकारी संस्था, खरेदी विक्री संघ आणि बाजार समित्या यांचा यात समावेश आहे. बाजार समित्यांबाबतचा निवडणुकीचा निर्णय मात्र जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित असल्याची माहिती देण्यात आली आहे.