मुक्त विद्यापीठाच्या बी. एड. संपर्क सत्रांना ऑनलाईन सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:27+5:302021-04-02T04:31:27+5:30

देशात कोरोनाची परिस्थिती बिकट असल्याकारणाने व शाळा महाविद्यालये बंद असून, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकअंतर्गत बी. एड. शिक्षणक्रमासाठी प्रवेश ...

Open University B.Sc. Ed. Contact sessions start online | मुक्त विद्यापीठाच्या बी. एड. संपर्क सत्रांना ऑनलाईन सुरूवात

मुक्त विद्यापीठाच्या बी. एड. संपर्क सत्रांना ऑनलाईन सुरूवात

देशात कोरोनाची परिस्थिती बिकट असल्याकारणाने व शाळा महाविद्यालये बंद असून, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकअंतर्गत बी. एड. शिक्षणक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर जिल्ह्यासह राज्यभर कोरोनाची रूग्ण संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनचे संकट निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रवेशित अध्ययनार्थीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व लॉकडाऊनच्या काळाचा सदुपयोग व्हावा, यासाठी ऑनलाईन अध्यापनाचा पर्याय स्वीकारत नंदुरबार येथील तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील अभ्यासकेंद्राच्या वतीने या वर्षीच्या संपर्क सत्रास ऑनलाईनच्या माध्यमातून सुरूवात करण्यात आली आहे.

प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुक्त विद्यापीठाच्या नंदुरबार येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयच्या वतीने ऑनलाईन संपर्क सत्रांना सुरूवात झाली असल्याची माहिती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकेश एस. रघुवंशी व समन्वयक प्रा. भानुदास जे. पावरा यांनी दिली आहे. या ऑनलाईन संपर्क सत्रात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे सुष्म अध्यापन सुरू असून, त्याअंतर्गत चेतक बदल, प्रस्तावना, दिग्दर्शन, फलकलेखन इत्यादी कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी शिक्षणशात्र महाविद्यालयाचे डॉ. युवराज पाटील, प्रा. मोईन शेख आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Open University B.Sc. Ed. Contact sessions start online