शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सापांच्या केवळ चार विषारी प्रजाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

मन्यार या सापाचे विष दंत लांबी फार लहान असते. त्‍याचे विष नागाच्‍या विषापेक्षा तीव्र व जहाल असते. या ...

मन्यार

या सापाचे विष दंत लांबी फार लहान असते. त्‍याचे विष नागाच्‍या विषापेक्षा तीव्र व जहाल असते. या सापाचा निळसर काळा रंग, त्‍यावर पांढरे आडवे पट्टे शेपटी पासून सुरू होतात व डोक्‍याकडे ठिपके होत येतात. हा खूपच शांत स्‍वभावाचा साप आहे. मन्‍यार सापाचे विष मज्‍जातंतूवर परिणाम करते.

घोणस

या सापावर तपकिरी रंगावर गोल काळ्या ठिपक्‍यांच्‍या तीन रांगा असतात. शरीराने अजगर प्रमाणे जाडजूड, सुमारे चार ते पाच फूट लांब असतो. हा ३० ते ४० पिलांना जन्‍म देतो. चिडल्‍यास कुकरच्‍या शिटी प्रमाणे आवाज काढतो. या सापाचे विष दंत लांब असतात. सर्पदंश झालेल्‍या जागी तीव्र वेदना सुरू होऊन दंश भोवतालचा भाग सुजू लागतो.

नाग

नागाची ओळखण्याची सर्वात मोठी खुण म्‍हणजे त्‍याचा फणा. नागाच्‍या डोक्‍यामागील काही बरगड्या अति‍शय लवचीक असतात. त्‍यामुळे नागाला फणा काढणे शक्‍य होते. नागांना फण्‍याच्‍या मागील बाजूस १० चा आकडा असू शकतो. गव्‍हाळी फिकट, काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्‍त आढळतात.

फुरसे

फुरसे एक‍ ते दीड फुटापर्यंत लांबी असलेला साप आहे. याचा रंग गडद तपकिरी असतो. पाठीच्या दोन्ही बाजूस एकेक फिकट पांढरी नागमोडी रेषा असते. हा चिडल्‍यावर शरीराचा आकार एस प्रमाणे करुन विशिष्ट प्रकारचा आवाज करतो. याचे विष दंत फार लांब असतात. त्‍यांच्‍या विषात रक्‍ताच्‍या गाठी करण्‍याची क्षमता असून विष फार घातक आहे.