दुचाकी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:06 IST2020-06-29T12:04:55+5:302020-06-29T12:06:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर पानबारा गावाच्या शिवारात दहिवेल कडून सुरत कडे जाणाऱ्या मोटर सायकलला झालेल्या ...

One killed in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात एक ठार

दुचाकी अपघातात एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर पानबारा गावाच्या शिवारात दहिवेल कडून सुरत कडे जाणाऱ्या मोटर सायकलला झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. विसरवाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
जितेंद्र बाळू पाटील (३८) रा.सुरत असे मयताचे तर गणेश माधवराव पाटील (४१) असे जखमीचे नाव आहे. दोघे श्रीनिवास सोसायटी, सुरत येथील रहिवाशी आहेत. दोन्ही मित्र शेतीच्या कामानिमित्त साक्री तालुक्यात आले होते. आपली कामे आटपून दोघेही मोटरसायकलने (क्रमांक जी.जे.०५ डी.आर.३६२४) सायंकाळी दहिवेल येथून सुरत कडे जाण्यास निघाले असताना धुळे सुरत महामार्गावरील पानबारा गावाच्या शिवारात हॉटेल सुजल च्या समोर हा अपघात झाला.
सुरत कडून धुळ्याकडे जाणाºया चारचाकी वाहनाने मोटरसायकलला कट मारून अपघात केला. या अपघातात मोटरसायकल वरील दोघेही जण महामार्गावर आदळले गेल्याने गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना विसरवाडी पोलीस व महामार्ग पोलिसांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर चार चाकी वाहन व चालक घटनास्थळावरून पसार झाला.
उपचारादरम्यान जितेंद्र बाळू ठाकरे याचा रुग्णालयात मृत्यू झाला. दोघेही सुरत येथे रिक्षा चालक आहेत. विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वळवी यांनी यांनी मयताचे शवविच्छेदनानंतर नातेवाईकांना स्वाधीन केले.
याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गणेश माधवराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अरुण कोकणी करीत आहेत.

Web Title: One killed in a two-wheeler accident