शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार, दोनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात एकजण ठार तर दोनजण जखमी झाल्याची घटना घडली. लाल दिव्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात एकजण ठार तर दोनजण जखमी झाल्याची घटना घडली. लाल दिव्याच्या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातप्रकरणी तब्बल २० दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवापूर तालुक्यातील विजापूर गावाच्या नदीफळी भागात ट्रॅक्टरचा अपघात होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला. विकास लाजरस गावीत (१८) रा.धुळीपाडा, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. विकास हा विनापासींगचे ट्रॅक्टर घेऊन नदीकाठावरील आजोबांच्या शेतात नांगरणीचे काम करीत होता. ट्रॅक्टरचा टायर  फुटल्याने शेतीलगतच्या उतारावरून ट्रॅक्टर घसरून उलटले. दुसरी घटना सारंगखेडा पुलावर घडली. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भरधाव वेगातील लाल दिव्याच्या वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. त्यात दोन जण जखमी झाले होते. ज्ञानेश्वर रमेश साळुंखे व आनंदा पंढरीनाथ पानपानटील, रा.उधना, सुरत असे जखमींची नावे आहेत. भरधाव आलेल्या लाल दिव्याच्या वाहनाने (क्रमांक एमएच १९ एम ०४७०) दुचाकीला (जीजे १९-९८५५) जबर धडक दिली.  २० दिवसानंतर ज्ञानेश्वर साळुंखे यांनी फिर्याद दिल्याने सारंगखेडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.