शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-मोटारसायकल अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रकाशा रस्त्यावरील शिरूड चौफुलीजवळ ट्रक व मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : प्रकाशा रस्त्यावरील शिरूड चौफुलीजवळ ट्रक व मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. जखमी युवकाला सुरत येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, शिरूड चौफुली लगतच्या दोन्ही बाजूला बेकायदेशीर अतिक्रमण वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून याठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी होत आहे.शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रकाशाकडून शहादाकडे पपईने भरलेला ट्रक (क्रमांक जी.जे. ०१ सीटी १३३९) भरधाव वेगाने येत असताना शिरुडकडून शहाद्यात येणारे मोटारसायकलस्वार (क्रमांक एम.एच.३९ पी- ६९६३)  चौफुली रस्ता ओलांडत असताना ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. त्यातील पुरुषोत्तम हिरामण  पाटील (४६, रा.गांधी चौक, शहादा) यांना उपचारासाठी धुळे येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर विलास लिमजी पाटील (५०, रा.मलोणी) यांच्यावर शहादा येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी सुरत येथे खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. घटनेचे वृत्त कळताच शहरातील गुजर गल्लीतील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली.  शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तुषार पाटील, प्रशांत पाटील, भरत पाटील, मिलिंद पाटील, संदीप पाटील, मुन्ना पाटील, कमलेश पाटील, यशवंत पाटील, सुरेश पाटील, गिरीश पाटील, हर्षल पाटील,  बादल गिरासे, कृष्णा पाटील यांच्यासह अनेक युवकांनी जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्याच्या कामाची गती वाढली असून प्रकाशा ते शहादा रस्त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यात शिरुड चौफुलीवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदेशीर अतिक्रमण वाढल्याने व काहींनी प्लॅस्टीक कागद टाकून मोठमोठ्या टपऱ्या उभारल्या आहेत. त्यामुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने याठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शिरूड चौफुली श्री स्वामी विवेकानंद बसथांबा हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत असल्याने बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे.