शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : पानसेमलपासून नजीक असलेल्या आमदा येथे अंगणात झोपलेल्या इसमावर बिबटय़ाने हल्ला करून जखमी केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : पानसेमलपासून नजीक असलेल्या आमदा येथे अंगणात झोपलेल्या इसमावर बिबटय़ाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. दरम्यान, शनिवारी बिबटय़ाने युवतीवर हल्ला करून ठार केल्याची घटना व रविवारी इसमावर केलेल्या हल्ल्याच्या घटनांमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत वृत्त असे की, आमदा, ता.पानसेमल येथील शिवदास पाडवी हे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या आंगणात झोपले होते. रात्री साडेनऊ ते दहा वाजेदरम्यान अचानक बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला केला. बिबटय़ाने पंजाच्या सहाय्याने त्यांच्या मानेजवळ झडप घालून गंभीर जखमी केले. बिबटय़ाने तेथून शेताकडे पलायन केले. पाडवी यांना तात्काळ पानसेमल येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बडवानी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घराजवळ बांधलेल्या शेळी किंवा बैल यांच्यावर हल्ला न करता चक्क माणसावर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाडवी यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ जमा झाले. ग्रामस्थांनी लागलीच वनविभागाला घटनेची माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सेंधवा वनविभागाचे अधिकारी केशवसिंह पट्टा, विजय गुप्ता, उपवनमंडळ अधिकारी नोरके, पानसेमल वनपरिक्षेत्र सहाय्यक प्रदीप पवार, खेतिया वनपरिक्षेत्र सहाय्यक भुरू खान, खेतिया व पानसेमल वनविभागाचे कर्मचारी राजा मौर्य, बाबूलाल मौर्य, प्रमोद गुर्जर, महेश तोमर, निलेश पाटील, अनिल चौहान, संतोष आलोने, जितेंद्र मुवेल यांनी घटनास्थळी भेट दिली. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असून इंदूर येथून टायगर स्ट्राईक फोर्स रेस्क्यू टीमही पानसेमल व खेतिया परिसरात दाखल झाली आहे. लवकरच हिंस्त्र प्राणी व बिबटय़ांना जेरबंद करण्यात येईल, असे वनविभागातर्फे सांगण्यात आले.दरम्यान, शनिवारी सायंकाळच्या सुमारास भडगोन शिवारात शेतातून घरी जाणा:या 17 वर्षीय संगीता आर्य या युवतीवर बिबटय़ाने हल्ला करून ठार केल्यानंतर रविवारी रात्री पुन्हा आमदा येथे शिवदास पाडवी यांच्यावर बिबटय़ाने हल्ला केला. या घटनांमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.