शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

वाहनावरुन पडल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:43 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील अलीविहिर ते देवमोगरा यादरम्यान भरधाव वेगातील अवैध प्रवासी वाहनावरुन पडल्याने २० वर्षीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील अलीविहिर ते देवमोगरा यादरम्यान भरधाव वेगातील अवैध प्रवासी वाहनावरुन पडल्याने २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला़ ही घटना २५ जून रोजी सकाळी ९ वाजता घडली होती़ याप्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़रोशन हात्या तडवी रा़ केवडी ता़ अक्कलकुवा असे मयत युवकाचे नाव आहे़ २५ रोजी तो अक्कलकुवा येथे एमएच ०५ जी २५९१ या वाहनाने येत होता़ दरम्यान वाहनचालक विनायक दमण्या वसावे रा़ मोलगी ता़ अक्कलकुवा याने त्यास वाहनाच्या मागे लटकण्यास सांगितले होते़ यातून अलीविहीर ते देवमोगरा गावादरम्यान वळणावर रोशन याचा हात सुटल्याने तो रस्त्यावर पडला़ यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला़ घटनेनंतर चालक विनायक याने गाडीमालक आणि मयताचे कुटूंबिय यांना चुकीची माहिती दिल्याने अक्कलकुवा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद होती़ परंतु पोलीसांकडून तपास करण्यात आल्यानंतर भरधाव वेगामुळे रोशन याचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर पोलीसांनी कारवाई केली़ याबाबत पोलीस नाईक किशोर मोहन वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित विनायक वसावे याच्याविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मरणास कारणीभूत ठरणे तसेच जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़