लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चोरीच्या उद्देशाने फिरणाºया एकास शहादा येथे अटक करण्यात आली. खुलश्या जंगल्या पाडवी, रा.दुकान मांडवी, ता.धडगाव असे संशयीताचे नाव आहे.
अमावस्येच्या रात्री चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानांच्या आड लपून पाडवी हा आपला उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करीत होता. शहादा पोलीस ठाण्याचे गस्ती पथक रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास गांधी चौकात गेले असता तेथे खुलश्या पाडवी हा दुकानांच्या आड लपलेला दिसून आला. त्याला शिताफिने ताब्यात घेतले. याबाबत पोलीस कर्मचारी विजय ढिवरे यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}