शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमधून पोळून निघालेल्या दीड हजार मोठ्या व लघुउद्योगांनी घेतली भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागाचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना सलग तीन महिन्यांच्या लाॅकडाऊनमुळे १५० कोटी रुपयांचा फटका बसला ...

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागाचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना सलग तीन महिन्यांच्या लाॅकडाऊनमुळे १५० कोटी रुपयांचा फटका बसला होता. यातून सावरत हे उद्योग आता पुन्हा उभारी धरत असून, यातून नवीन मार्ग सापडून नव्याने अर्थकारणाला सुरुवात झाली आहे.

मार्च २०२०पासून लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे जनजीवन थांबले होते. यात नंदुरबार जिल्ह्यातील दीड हजार उद्योग समूहांचा समावेश होता. कालांतराने ३३ टक्के कामगारांसह उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली खरी; परंतु उत्पादनवाढीसाठी लागणारे मनुष्यबळ, कच्चा माल याचा अभाव असल्याने उद्योगाची गाडी रुळावर येतच नव्हती, जून महिन्यात सुरू झालेल्या उद्योगांना खऱ्या अर्थाने ऑक्टोबर २०२०पासून उभारी मिळण्यास सुरुवात झाली. यात जिल्हा उद्योग केंद्रातून चालवण्यात येणारे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार उन्नती कार्यक्रम सर्वाधिक मदतीचे ठरले होते. याअंतर्गत बँकांकडे ५० लाख रुपयांचे उद्योग सुरू करण्यासाठी प्रस्ताव उद्योजकांकडून देण्यात आले होते. यातून नंदुरबार जिल्ह्यात ३० कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन त्यातून उत्पादन सुरू होऊन रोजगार निर्मिती झाली आहे. हे उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडूनही तातडीने परवानगी देण्यात आल्याने जिल्ह्यातील उद्योगधद्यांना लाभ झाला.

लाॅकडाऊन काळानंतर उभ्या राहणाऱ्या उद्योगांना रोजगार उन्नती कार्यक्रम हा सर्वाधिक लाभदायकही ठरला होता. २०१९ -२० या वर्षात ४६ नवे उद्योग सुरू करण्यात आले होते. यातून २३ कोटी ५० लाख रुपयांची थेट गुंतवणूक झाल्याने जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाचा आलेख हा वर सरकता राहिला होता. प्रामुख्याने कुशल आणि अशकुल अशा दोन्ही क्षेत्रांतील मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याने अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली नव्हती. प्रामुख्याने मिरची, मसाले, जिनिंग, प्रेसिंग, काॅटन सीड, ऑइल मिल, फूड प्रोसेसिंग युनिट, कृषिपूरक साहित्यनिर्मिती, फळप्रक्रिया, दुग्धोत्पादन आदी उद्योग बळकट होत गेल्याने लाॅकडाऊननंतरची बेकारीची लाट जिल्ह्यावर आली नाही.

एक हजार ४४६ लघुउद्योग

नंदुरबार जिल्ह्यात दोन मोठे उद्योग आहेत, तर एक हजार ४४६ लघुउद्योग आहेत. मोठ्या उद्योगामध्ये ऑइल मिल व डाळ मिल यांचा समावेश आहे. लाॅकडाऊन उघडल्यानंतर ऑइल मिलमधील पुन्हा जुन्या वेगाने सुरू झाल्या होत्या.

जिल्ह्यात मिरची प्रक्रिया मसाले, इंजिनिअरिंग, कृषिपूरक, उद्योग, दुग्धोत्पादन यांसह विविध उद्योगांचा समावेश आहे. लाॅकडाऊन उघडल्यानंतर नवापुरातील वस्त्रोद्योग, नंदुरबारातील मिरची व मसाले उद्योग स्थिरस्थावर होण्यास बराच वेळ लागला; परंतु कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार हे उद्योग सुरू आहेत. एकीकडे हे उद्योग सुरू असताना दुसरीकडे जिल्ह्यातील दहा कोल्डस्टोरेजही सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्ह्यातील कोल्डस्टोरेज दोन महिने बंद राहिल्याने गेल्या वर्षात मोठे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागले होते. मालाचा साठा झाला असला तरी तो काढण्यासाठी मजूरच नसल्याने मोठ्या अडचणींना व्यापाऱ्यांनी तोंड दिले हाेते.