भरदिवसा दीड लाख लांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:33 IST2019-12-14T11:33:40+5:302019-12-14T11:33:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर शहरात भरदिवसा दुचाकीची डिक्की फोडून त्यातील दीड लाख रुपये लांबवल्याची घटना समोर आली ...

One and a half lakhs extended throughout the day | भरदिवसा दीड लाख लांबवले

भरदिवसा दीड लाख लांबवले

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर शहरात भरदिवसा दुचाकीची डिक्की फोडून त्यातील दीड लाख रुपये लांबवल्याची घटना समोर आली आहे़ गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील स्वस्तिक पेट्रोलपंपावर हा प्रकार घडला़
नवापुर येथील व्यापारी सुनिल तुळशीराम शर्मा हे त्यांच्या दैनंदिन कामासाठी स्टेट बँकेत गेले होते़ येथून त्यांनी दीड लाख रुपये काढून ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले़ दरम्यान गाडीत पेट्रोल भरण्यासाठी स्वस्तिक पेट्रोलपंपावर गेले असता, याठिकाणी अचानक त्यांची चावी हरवली़ परिसरात चावी हरवली असेल असा विचार करत त्यांनी परिसरात शोधाशोध सुरु केली़ दरम्यान त्यांनी दुचाकी पेट्रोलपंपावरच लावली होती़ याच कालावधीत अज्ञात चोरट्याने चावीने दुचाकीची डिक्की उघडून त्यातील दीड लाख रुपये पिशवीसह लंपास केले़ काही वेळानंतर शर्मा हे दुचाकीजवळ आल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला़
याप्रकरणी सुनील शर्मा यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल असून तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत़ दरम्यान चोरीच्या या घटनेमुळे नवापुर शहरात एकच खळबळ उडाली होती़

शर्मा यांची दुचाकीची चावी चोरी करुन चोरट्याने ही चोरी केल्याचे पेट्रोलपंपावर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे़ पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरु केला आहे़ सीसीटीव्हीमध्ये दिसणारा चोरटा हा अत्यंत शिताफीने चोरी करत असल्याचे दिसून आले असून या प्रकाराची शहरात चर्चा सुरु आहे़

Web Title: One and a half lakhs extended throughout the day