शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

साडेअकरा लाखांचे मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील नवा नागरमुथा गावाजवळ पोलीसांनी सापळा रचून अवैध मद्यासह दोन चारचाकी वाहने असा साडेअकरा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील नवा नागरमुथा गावाजवळ पोलीसांनी सापळा रचून अवैध मद्यासह दोन चारचाकी वाहने असा साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला़ शनिवारी रात्री पोलीसांनी ही कारवाई केली़ याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे़अक्कलकुवा तालुक्यात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्यासह पथकाने शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नवानागर मुथा गावाजवळ सापळा रचला होता़ दरम्यान बºहाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावरुन अक्कलकुवा शहरात मिनीट्रक येत असल्याचे पोलीसांना दिसून आले़ त्यांनी ते थांबवून चालकाकडे चौकशी केली़ यावेळी चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकाने ट्रकची तपासणी केल्यावर त्यात अवैघ मद्याचे १०० खोके आढळून आले़ याप्रकरणी पोलीस पथकाने हितेंद्र महेंद्रसिंग चंदेल यास ताब्यात घेतले आहे़ तपासणी सुरु असताना मिनीट्रकचालक फरार होण्यात यशस्वी झाला होता़ही कारवाई पोलीस उपअधिक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे उपनिरीक्षक बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक बागुल, पोलीस नाईक अमोल खवळे, शकील शेख, अश्विन ठाकरे, किरण पाडवी चालक पठाण यांच्या पथकाने केली़ कारवाईमुळे तालुक्यातील अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे़

पोलीसांनी ताब्यात घेतलेला संशयित हितेंद्र चंदेल हा चारचाकी वाहनाने मिनीट्रकला मार्ग दाखवत होता़ पोलीसांनी सापळा रचून मिनीट्रकची चौकशी सुरु केल्यानंतर वाहनाने पुढे निघून गेलेला मनमोहनसिंग हा पुन्हा परत आला अन पोलीसांच्या हाती लागला होता़ अवैध मद्याचे खोके असलेल्या मिनीट्रकला मार्ग दाखवणा दोघांनाही पोलीसांनी चारचाकी वाहनासह हितेंद्र चंदेल यास अटक केली़