बैल हाकलल्याच्या वादातून घोटाणे येथे वृद्धास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:01 IST2019-09-04T12:01:25+5:302019-09-04T12:01:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील घोटाणे येथे शेतात चरणारे बैल हाककल्याच्या कारणावरुन वृद्धास तिघांनी मारहाण केली़ सोमवारी सायंकाळी ...

Old man beaten at scam by bull bull | बैल हाकलल्याच्या वादातून घोटाणे येथे वृद्धास मारहाण

बैल हाकलल्याच्या वादातून घोटाणे येथे वृद्धास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील घोटाणे येथे शेतात चरणारे बैल हाककल्याच्या कारणावरुन वृद्धास तिघांनी मारहाण केली़ सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ 
घोटाणे येथील भिवराज गोसावी यांच्या शेतात रविंद्र ऊर्फ अप्पा गोसावी यांचे बैल सोमवारी चरत होत़े हे बैल दगडू भिवराज गोसावी यांनी हाकलून लावले होत़े या कारणातून सायंकाळी रविंद्र गोसावी, सुरेखा गोसावी व अविनाश गोसावी यांनी दगडू गोसावी यांचे वडील भिवराज गोसावी यांच्यासोबत वाद घालून त्यांना पोटात आणि पाठीवर काठीने मारुन जखमी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ याप्रकरणी दगडू गोसावी यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
 

Web Title: Old man beaten at scam by bull bull