शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार तरीही वेळेवर होतेय जातपडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:31 IST

नंदुरबार : येथील जात पडताळणी समितीत प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी आहे. कमी अधिकारीवर्गात देखील येथील जात पडताळणीचे कामकाज सुरळीत ...

नंदुरबार : येथील जात पडताळणी समितीत प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी आहे. कमी अधिकारीवर्गात देखील येथील जात पडताळणीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. असे असले तरी अनेक विद्यार्थी ऐनवेळी जातपडताळणीसाठी प्रस्ताव सादर करतात. त्यातही अनेक त्रुटी राहत असल्यामुळे त्यांच्या प्रकरणांना उशीर होत असल्याचे चित्र आहे.

येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दररोज २० पेक्षा अधिक प्रस्ताव दाखल होतात. विद्यार्थ्यांचेच प्रस्ताव अधिक असतात. निवडणुकीच्या काळात मात्र ऐनवेळी संबंधित इच्छुक उमेदवार प्रकरणे दाखल करतात. अशा वेळी त्यांना केवळ टोकण दिले जाते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांना निवडून आल्यानंतर सहा महिने ते वर्षभराच्या आत पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यामुळे वेळेवर आणि परिपूर्ण प्रस्ताव सादर केले गेले तर असे प्रस्ताव पारित करण्यात फारशा अडचणी येत नाहीत. साधारणत: २० ते २५ मिनिटात असे प्रस्ताव समिती पारित करीत असते. त्यामुळे परिपूर्ण प्रस्ताव सादर करणेदेखील आवश्यक असते.

अधिकारी अतिरिक्त पदभारमुळे त्रस्त

n येथील जात प्रमाणपत्र जिल्हा पडताळणी समिती कार्यालयात पुरेसे मनुष्यबळ आहे. आता ॲानलाइनची प्रक्रियादेखील होत असते. त्यामुळे मनुष्यबळ पुरेसे असले तरी अधिकारी वर्ग पुरेसा नाही. अनेक अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी पुरेसा वेळ देता येत नाहीत. त्याचा परिणाम प्रकरणे व प्रस्ताव वेळेत पारित करण्यावर होतो. असे असले तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांना सर्वाधिक प्राधान्य देऊन ते वेळेवर निकाली काढले जात असते. सर्वच अधिकाऱ्यांची ती मानसिकता आहे.

n जिल्ह्याला लागून दोन राज्यांच्या अर्थात गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमा आहेत. सीमेवरील गावांमधील किंवा इकडे जन्म व तिकडे रहिवास असलेल्यांचे प्रकरण पारित करतांना मोठी कसरत असतो. त्यासाठी व्हेरीफिकेशनसाठी संबंधित कार्यालयांकडे पत्रव्यवहारही करावा लागतो.

n समितीकडे प्रलंबित प्रकरणे ९० असून त्रुटींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या ७५ आहे. समितीस्तरावर लागलीच निर्णय घेतला जातो. वेळेवर त्रुटीची पूर्तता करणे आवश्यक असते.

समितीकडे प्रस्ताव सादर करतांना तो परिपूर्ण असावा. ऐनवेळी सादर करण्यापेक्षा वेळेत प्रस्ताव आले तर त्यांच्यावर लवकर निर्णय घेता येतो. परंतु अनेक विद्यार्थी व पालक हे ऐनवेळी प्रस्ताव सादर करतात आणि प्रमाणपत्रासाठी घाई करतात. तसे होऊ नये यासाठी प्रस्ताव वेळेवर सादर करावा. अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त पदभार असतांनाही कामकाज सुरळीत आहे. -राकेश पाटील,

जात पडताळणी समिती अध्यक्ष,नंदुरबार