पिंप्री येथे रस्त्यावर गुरे बांधल्यामुळे वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST2021-07-22T04:20:05+5:302021-07-22T04:20:05+5:30

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पिंप्री गावात जाणाऱ्या हमरस्त्यावर नेहमी अवैधरीत्या बैल, गायी आदी गुरे बांधत असल्यामुळे ट्रॅक्टर, चारचाकी, ...

Obstruction of traffic due to construction of cattle on the road at Pimpri | पिंप्री येथे रस्त्यावर गुरे बांधल्यामुळे वाहतुकीला अडथळा

पिंप्री येथे रस्त्यावर गुरे बांधल्यामुळे वाहतुकीला अडथळा

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पिंप्री गावात जाणाऱ्या हमरस्त्यावर नेहमी अवैधरीत्या बैल, गायी आदी गुरे बांधत असल्यामुळे ट्रॅक्टर, चारचाकी, दुचाकी वाहने चालविण्यात नेहमीच अडचणीचे ठरते. त्यामुळे गुरे मालक व ग्रामस्थ यांच्यात वाद होतात, तसेच रस्त्यावर गुरे बांधण्यावरून अनेक तोंडी तक्रारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत; परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दोन दिवसांपूर्वी या हमरस्त्यावर गुरे बांधण्यावरून ग्रामस्थ व गुरे मालक यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे या किरकोळ कारणावरून पुढे जाऊन भांडणाचे पर्यावसन मोठ्या घटनेत झाले तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी समन्वय साधून गुरे मालकांना समज देऊन या प्रकाराला वेळीच आळा घालावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत.

Web Title: Obstruction of traffic due to construction of cattle on the road at Pimpri