शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉनचा मांजा यंदाही करतोय अनेकांना जायबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पतंगोत्सवात यंदा चायनामेड मांजाची धूम आहे. परंतू हा मांजा अनेकांना जायबंदी करणारा ठरत असल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पतंगोत्सवात यंदा चायनामेड मांजाची धूम आहे. परंतू हा मांजा अनेकांना जायबंदी करणारा ठरत असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यासाठी दबाव वाढत आहे. प्रशासनाने मात्र त्याकडे अद्यापही गांभिर्याने पाहिले नाही. दरम्यान, नॉयलॉनच्या दोराला बंदी असतांनाही त्याची सर्रास विक्री होत आहे. चायना मांजामध्ये देखील नॉयलॉनचा वापर होत असल्याचे बोलले जात आहे.नंदुरबारात मकरसंक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी दोन ते तीन आठवडेआधीपासूनच तयारीला वेग येतो. १५ दिवसांवर हा उत्सव येवून ठेपल्याने तयारीला वेग आला आहे. शहरातील चौकाचौकात, मुख्य रस्त्यांवर विविधरंगी पतंगांनी दुकाने थाटली आहेत. शिवाय पारंपारिकपद्धतीने मांजा तयार करण्यासाठी देखील गर्दी होऊ लागली आहे. येत्या येत्या आठवड्यात या माध्यमातून उलाढाल वाढणार आहे.चायना मांजापतंग उडवितांना मांजा महत्त्वाचा घटक असतो. जेवढा मजबूत मांजा तेवढे पतंग उडविण्याचा आनंद अधीक असतो. शिवाय प्रतिस्पर्धीची पतंग कापण्यासाठी देखील अशा मांजाची गरज असते. त्यामुळे मजबूत व धारधार मांजाची मागणी युवकांकडून आहे. यंदा चायना मांजा पतंगांच्या बाजारात धूम करीत आहे. इतर मांजापेक्षा स्वस्त असल्यामुळे त्याला मागणी असली तरी हा मांजा अनेकांच्या जीवावर उठला आहे. तुटून खाली पडला किंवा कशात अडकलेला मांजा मानवी शरिराच्या संपर्कात येवून अडकला तर मोठी जखमी करीत आहे. त्वचेत अडकल्यावर त्वचा फाडल्याशिवाय तो निघत नाही.अनेकवेळा त्याला त्वचेतून कापून बाहेर काढावे लागते. नॉयलॉन मिश्रीत हा दोरा असून त्याचा मजबूतपणा आणि टिकाऊपणा यामुळे तो तरुणांच्या पसंतीस उतरला आहे. शिवाय स्वस्त देखील आहेच.साडेतीनशे ते पाचशे रुपयांना पाच ते सहा हजार रुपये वार या प्रमाणे तो बाजारात उपलब्ध आहे. याशिवाय आकाशात उडणाऱ्या पक्षांना देखील हा मांजा जायबंदी करीत आहे. चायना मांजावर बंदी घालावी अशी मागणी पतंगोत्सवात दरवर्षी करण्यात येते परंतू प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. यंदा देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना आणि पक्ष्यांना जीवघेणा ठरणारा या मांजाची विक्री स्वत: विक्रेत्यांनीच बंद करावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.पारंपारिक मांजापारंपारिक मांजा बनविण्यासाठी कारागिरांकडे गर्दी वाढली आहे. शहरात २० ते २५ कारागिर असून गेल्या आठवड्यापासून मांजा तयार करण्यासाठी युवकांची गर्दी होत आहे. मांजा तयार करण्याचीही एक खास पद्धत व शैली आहे. त्यासाठी बाजारातून चक्री व दोरा कारागिरांकडे द्यावा लागतो.कारागिर लाख, काचेचा चूरा आणि इतर साहित्याचा खळ तयार करून तो या मांजाला लावत असतो. किमान तीन ते पाच हजार वार याप्रमाणे तो बनविला जातो. सध्या मांजा बनवून घेण्याकडे देखील तरुणांचा कल वाढला आहे. येत्या काळात पतंगोत्सवाची धूम आणखी वाढणार असून बाजारातील उलाढालही वाढणार आहे.पतंगांचे वेगवेगळे प्रकार...यंदा पारंपारिक पतंगासह विविध आकार व प्रकारातील पतंग बाजारात आलेले आहेत. चायना मेडचे पतंग देखील युवकांना भुरळ घालत आहेत. त्याच्या किंमती कमी असल्यामुळे त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. यंदा पतंगांवर कार्टून्सचे विविध पात्र तर आहेतच. एका पतंगाची किंमत किमान दोन रुपये तर जास्तीत जास्त २५ रुपये आहे. त्यामुळे पतंग विक्रीतूनच किमान दोन ते अडीच लाखांपर्यंत उलाढाल होत असते. यंदा मागणी चांगली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.