शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

पोषण ट्रॅक ॲप इंग्रजीत मात्र अंगणवाडी सेविकांचे शिक्षण जेमतेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST

बामखेडा : शासनाच्यावतीने अंगणवाडी सेविकांना ग्रामीण भागात गरोदर माता, महिला, व बालकांचा डाटा घेण्यासाठी ‘पोषण ट्रॅक ॲपची’ सुविधा उपलब्ध ...

बामखेडा : शासनाच्यावतीने अंगणवाडी सेविकांना ग्रामीण भागात गरोदर माता, महिला, व बालकांचा डाटा घेण्यासाठी ‘पोषण ट्रॅक ॲपची’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाडी सेविकांचे शिक्षण मुळातच अल्प शिक्षित आणि मराठी माध्यमांतून झाले असल्याने हे इंग्रजी ॲप वापरताना अंगणवाडी सेविकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यांमुळे पोषण ट्रॅक ॲपची भाषा मराठीतून करण्याची मागणी सर्वत्र होत आहे.

सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी हे पोषण ट्रॅक ॲप सुरू करण्यात आले असून, याद्वारे सेविका कामाचा डाटा रोज अद्यावत करतात. परंतु ॲपमधील भाषा इंग्रजीत असल्याने व अंगणवाडी सेविकांना भाषा पुरेशी येत नसल्याने अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक महिला अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दैनंदिन कामकाजासाठी शासनाकडून मोबाईल देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा व प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना व्यक्तीगतत मोबाईलवरच पोषण ट्रॅक ॲप डाऊनलोड करून त्यावरुनच माहिती भरणे सक्तीचे केले आहे. परंतु काही वयस्कर अंगणवाडी सेविका अल्पशिक्षित असल्या कारणाने त्यांना इंग्रजी भाषेचे फारसे ज्ञान नसल्याने दिवसभर काम करून ती माहिती भरताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, म्हणून या पोषण ट्रॅक ॲपमध्ये माहिती भरताना त्याची भाषा इंग्रजी ऐवजी मराठीत करावी अशी मागणी जिल्ह्यातील संपूर्ण अंगणवाडी सेविकांमार्फत होत आहे.

अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅक ॲपमध्ये इंग्रजीतून माहिती भरताना अडचणी येत आहेत आणि सेविकांच्या तशा तक्रारीदेखील शासनाकडे केलेल्या आहेत.बम्हणून त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा सर्व्हे करून सखोल माहिती भरायची असेल तर या ॲपची भाषा इंग्रजी ऐवजी मराठीमधून करावी तसा अहवाल शासनाकडे जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरीत पाठवावा जेणेकरून भाषा विषयीच्या तांत्रिक अडचणीला अंगणवाडी सेविकांना सामना करावा लागणार नाही.