शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: काकांचा नव्हे तर पक्षाचाच प्रचार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापूर विधानसभा मतदारसंघात खासदार डॉ.हिना गावीत यांचे काका भाजप विरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर विधानसभा मतदारसंघात खासदार डॉ.हिना गावीत यांचे काका भाजप विरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे खासदार डॉ.गावीत यांची भुमिका काय असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर दोन दिवसांपूर्वी नवापुरात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे  आवाहन कार्यकत्र्याना केल्यानंतर याविषयीच्या तर्कवितर्काना पुर्णविराम मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत नवापूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार शरद गावीत यांनी एकहाती तंबू सांभाळत हिना गावीत यांचा प्रचार केला होता. त्यामुळे खासदार डॉ.हिना गावीत त्या उपकाराची परतफेड करतील काय? त्यांची भुमिका काय राहिल. गेल्या आठवडय़ात काका, पुतणी एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे तर्कवितर्काना उधान आले होते. अखेर दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाजपतर्फे इच्छूक उमेदवार भरत गावीत व खासदार डॉ.हिना गावीत एकाच व्यासपीठावर आले. त्यांनी कार्यकत्र्याना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून निवडून आणण्याचे आवाहन केले. त्यामुळे खासदार डॉ.गावीत यांची भुमिका स्पष्ट झाल्याने कार्यकत्र्यामधील संभ्रमही दूर झाला आहे. अर्थात उमेदवारी अर्ज माघारीनंतर राजकीय खेळी कशा खेळल्या जातात त्यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.