शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर भरण्यासाठी पैसेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:48 IST

राधेश्याम कुलथे । लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : गोरगरीबांच्या घरातील स्टोव्हसाठी रेशनकार्डावर मिळणारे रॉकेल बंदच झाल्याने त्यांचे हाल होत ...

राधेश्याम कुलथे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : गोरगरीबांच्या घरातील स्टोव्हसाठी रेशनकार्डावर मिळणारे रॉकेल बंदच झाल्याने त्यांचे हाल होत आहेत. परिणामी नागरिकांना पुन्हा चूल पेटविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर देण्याचे स्वप्न सरकारने दाखविले पण सिलिंडर भरण्यासाठी पैसेच नसल्याने गरीबांना वर्षाला कसेबसे पाच ते सहा सिलिंडर वापरावे लागतात. त्यामुळे योजनेचा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे. गॅसही नाही व रॉकेलही नाही अशी अवस्था झाली असून रेशनकार्डावर पुन्हा रॉकेल देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
रेशन दुकान हे सर्वसामान्यांचा आधारवड आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांनी अनेक कुटुंबांना जगविले. सध्या रेशनवर गहू, तांदूळ मिळतो. पूर्वी रॉकेलही मिळत होते. सध्या हे रॉकेल बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. सर्वसामान्य कुटुंबासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेतून सर्वसामान्यांना गॅस सिलिंडर दिले जाणार होते. आॅनलाईन गॅस भरण्यासाठी पैसेही बँकेत जमा करण्यात आले. परंतु गॅस भरण्यासाठी बँकेत तीन महिन्याकरिता पैसे जमा करण्यात आले. आता ते बंद झाल्याने लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसणाऱ्या कुटुंबीयांना गॅस भरणे परवडत नसल्याने गॅससाठी पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न पडला आहे. उज्ज्वलाचा गॅसही नाही आणि हक्काचे मिळणारे अनुदानातील रॉकेलही नाही. शहरी भागातील दाट लोकवस्ती आणि अतिदुर्गम भागातील झोपडपट्टी भागात सकाळी आंघोळीचे पाणी तापविणे, स्वयंपाक करणे यासाठी सर्रास पुन्हा चुलीचाच वापर केला जातो किंवा स्टोव्हचा वापर केला जातो. पण रॉकेल मिळत नसल्याने अडचणी येत आहेत.
रॉकेल वाटप बंद
रेशनकार्डवरील रॉकेल नियंत्रित दराने मिळत होते. प्रत्येक कुटुंबाला पाच ते २४ लीटरप्रमाणे संख्येनुसार रॉकेल मिळत होते. पण एक गॅस सिलिंडर असणाऱ्यांनाही चार लीटर प्रतिमहिना प्रतिकार्ड रॉकेल दिले जात होते. पण हे रॉकेल वाटप बंदच असल्याने नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

शहादा तालुक्यात उज्ज्वला योजना केंद्र सरकारच्या धोरणामुळे सुरू झाली. शहादा तालुक्यातील सोना गॅस एजन्सी, रेखा गॅस एजन्सी, वेदांत गॅस एजन्सी, आदिराजा गॅस एजन्सी मिळून तालुक्यात सुमारे १५ हजार ८१६ उज्ज्वला योजनेतील गॅस कनेक्शन आहेत. या ग्राहकांचा गॅस वापरण्याचे प्रमाण कमी आहे. हे ग्राहक गरीब कुटुंबातील असल्याने उज्ज्वला गॅस ते पर्याय म्हणून वापरतात. त्यामुळे वर्षाला चार ते पाच सिलिंडरच ते घेतात. त्यामुळे ते चुलीचा वापर पुन्हा करतात.