नंदुरबारात नऊ हजाराचा नॉयलॉन मांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:45 PM2020-01-14T12:45:17+5:302020-01-14T12:45:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील दोन दुकानांमधून एलसीबीने नऊ हजारांचा नॉयलॉन मांजा जप्त केला आहे. दोघांना ताब्यात घेण्यात ...

Nine thousand nylon nuggets seized in Nandurbar | नंदुरबारात नऊ हजाराचा नॉयलॉन मांजा जप्त

नंदुरबारात नऊ हजाराचा नॉयलॉन मांजा जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील दोन दुकानांमधून एलसीबीने नऊ हजारांचा नॉयलॉन मांजा जप्त केला आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून नॉयलॉन मांजा विक्री रोखण्याची मागणी होत होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर बंदी देखील घातली आहे.
विक्रेते आनंद गोपाळ जयस्वाल व सनी अशोककुमार तेजवानी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पतंगोत्सवात मोठ्या प्रमाणावर नॉयलॉनचा मांजाचा वापर केला जातो. या मांजामुळे अनेकजण जायबंदी होत असतात. शिवाय पक्ष्यांना देखील ईजा होत असते. त्यामुळे नॉयलॉन मांजावर बंदी घालावी अशी मागणी दरवर्षी करण्यात येते. असा मांजा विक्रीवर १५ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी देखील घातली आहे. असे असतांनाही काही विक्रेते त्याची विक्री करीत आहेत.
अशा विक्रेत्यांविरुद्ध एलसीबीने थेट कारवाई सुरू केली आहे. पोलीस निरिक्षक किशोर नवले यांना दोन ठिकाणी नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. जळका बाजारात आनंद गोपाल जयस्वाल यांच्या दुकानासमोरील ओट्यावर विक्री होणारा ३२०० रुपये किंमतीचा मांजा जप्त करण्यात आला. तसेच मंगळ बाजारातील सनी अशोककुमार तेजवाणी यांच्या दुकानातूनही ५८०० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे.
दोघांना ताब्यात घेवून शहर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

Web Title: Nine thousand nylon nuggets seized in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.