शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीचा नवा आदर्श, पावरी भाषेतील शाॅर्ट फिल्म करणार काेरोना समस्येला स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST

धडगाव येथील आदिवासी जनजागृती टीम आणि उलगुलान फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून या शाॅर्ट फिल्म तयार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात ...

धडगाव येथील आदिवासी जनजागृती टीम आणि उलगुलान फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून या शाॅर्ट फिल्म तयार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली असून, या शाॅर्ट फिल्म सध्या दुर्गम भागात धुमाकूळ घालत आहेत. धडगाव आणि परिसरातील आदिवासी युवकांनी गेल्या एक महिन्यात आदिवासी पावरी बोली भाषेत ऑक्सिजन, मास्क, कोरोना लस, कोरोना वालाबाबा या नावाने शाॅर्ट फिल्म बनवून त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्मार्ट फोन वापरणाऱ्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत. यातून माहितीचा प्रचार व प्रसार होऊन अनेक गोष्टींवर भाष्य झाल्याचे सांगण्यात आले आहे. यातून मास्कचा वापर कसा करावा, कोरोनाबद्दलची माहिती, संसर्ग कसा होताे, उपचार कोठे व कसा मिळतो, ऑक्सिजन केव्हा हवा यासह अनेक बाबींवर चर्चा करण्यात येत आहे. अर्जुन पावरा, राकेश पावरा, कल्पेश पावरा, दीपक पावरा, किरण पावरा, वर्षा शेल्टे यांनी लघुचित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.

सातपुड्यात लस घेतल्याने माणूस मरतो यासोबत इतर अनेक अफवा आहेत. यातून सातपुड्यातील दुर्गम भागापर्यंत कोरोना लसीकरण होऊ शकलेले नाही. या मुद्द्यावर भर देत जनजागृती टीमने नागरिकांच्या भावनाही जाणून घेतल्या होत्या. यावेळीही लसीकरणाबाबत सकारात्मक अशी भूमिका घेण्यात आली नसल्याने जनजागृतीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उलगुलानचे सह संस्थापक राकेश पावरा यांनी दिली.

दुर्गम भागातील गावपाड्यांवर जाऊन शिक्षित युवकांनी मास्कचा वापर वाढविणे व कोरोना लसीकरण यावर भाष्यही केले. यावेळी त्यांच्याकडून मोबाईलचा आधार घेत कोरोनावाला बाबा ही शाॅर्ट फिल्म दाखविण्यात आली. यातून अनेकांचा गैरसमज दूर झाल्याचा दावा करण्यात आला. यातून अनेकांनी लस घेण्यासाठी स्वेच्छेने आरोग्य केंद्रांमध्ये हजेरी लावल्याची माहिती देण्यात आली. या जनजागृतीवर शाॅर्ट फिल्मस् धडगावसोबत अक्कलकुवा, शहादा व तळोदा तालुक्यातील आदिवासी बांधवांपर्यंतही पाेहोचविल्या जात आहेत.

दरम्यान, याबाबत उलगुलान फाउंडेशनचे संस्थापक नीतेश भारद्वाज यांनी सांगितले की, गेल्यावर्षी देखील लॉकडाऊनमध्ये व्हिडिओ बनवून समाजात जनजागृती करीत होतो. या कामासाठी आदिवासी जनजागृती टीमला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती. यंदाही जनजागृतीची ही मोहीम कायम ठेवली आहे.

जिल्ह्यातील चार तालुक्यांतील सुमारे तीन हजारपेक्षा अधिक नागरिकांनी केवळ आठवडाभरात या शाॅर्टफिल्म पाहून पसंती दिली होती.