नेटवर्कची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST2021-06-20T04:21:18+5:302021-06-20T04:21:18+5:30

स्वच्छतेची गरज नंदुरबार : कोरोनामुळे सर्वांच्याच मनात दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज असून, स्वत:ची काळजी ...

Network problem | नेटवर्कची अडचण

नेटवर्कची अडचण

स्वच्छतेची गरज

नंदुरबार : कोरोनामुळे सर्वांच्याच मनात दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज असून, स्वत:ची काळजी स्वत: घेणे आवश्यक आहे. काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी घाण टाकतात, ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

डासांचे प्रमाण वाढले

नंदुरबार : शहर व नवीन वसाहतींमध्ये डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही नाले व गटारींची स्वच्छता न झाल्याने डासांची उत्पत्ती वाढत आहे. पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाने याबाबत उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

साहित्य महागले

नंदुरबार : घरकुल बांधकामाचे सर्व साहित्य महाग झाल्याने तुटपुंजा अनुदानात अर्धेही काम होत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक लाभार्थींना घरकुले मंजूर झाली आहेत. मात्र, शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात घराचे काम पूर्ण होत नसल्याचे सांगण्यात येते.

कर्जमाफीचा लाभ द्या

शहादा : महात्मा फुले कर्जमाफी योजनेत पात्र असताना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेले अनुदानही या शेतकऱ्यांना न मिळाल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Network problem