शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा येथे विनामास्क व गर्दी करणाऱ्यावर कारवाईची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST

जनता कर्फ्यूत कोरोना प्रतिबधंक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याव पोलीस प्रशासनाकडून तोकडी कारवाई केली जात आहे. अक्कलकुवा शहरासह तालुक्यातील कोरोना ...

जनता कर्फ्यूत कोरोना प्रतिबधंक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याव पोलीस प्रशासनाकडून तोकडी कारवाई केली जात आहे. अक्कलकुवा शहरासह तालुक्यातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या पंधरा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली असून सध्या तालुक्यात ६० रुग्ण कोरोना पॅाझिटिव्ह आहेत. त्यातील अधिकाधिक रूग्ण होम आयसोलेशनमध्ये असून ८ ते १० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सध्या नियंत्रणात असली तरी तपासण्या वाढण्याची गरज आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यासंदर्भात योग्य खबरदारी घेत उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जनतेने टाळेबंदी कालावधीत नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तरुणांनी विनाकारण फिरू नये, तसेच सर्व दुकानदारांनी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे अन्यथा यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी दिले आहे.

संचारबंदीत गर्दीचे सत्र

जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना अक्कलकुवा तालुक्यातील खापर व मोलगी गावांमध्ये भाजीपाला व किराणा दुकानांवर खरेदी करण्यासाठी नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून,त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लघंन होत असल्याने या ठिकाणी सामाजिक अंतर पाळण्याची आवश्यकता असून, नागरिकांनी तोंडावर मास्क लावणे अत्यंत गरजेचे असताना या बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी स्वप्निल वानखेडे यांच्यातर्फे वारंवार केले जात आहे.