शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या दुर्गम भागात वाहन परवाना शिबिर सुरू करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

सध्या वाहनांची वाहतूक पोलिसांकडून कसून चौकशी होत असल्याने गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे जिल्हा व तालुकास्तरावरील कार्यालयीन कामे अनेक वेळा ...

सध्या वाहनांची वाहतूक पोलिसांकडून कसून चौकशी होत असल्याने गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे जिल्हा व तालुकास्तरावरील कार्यालयीन कामे अनेक वेळा स्थगित करण्यात आल्याने वाहन परवाने वितरण करणे बंद झाले होते. वाहन परवाने न मिळाल्यामुळे प्रशासकीय चौकशीला सामोरे जावे लागत आहे. पात्रता असताना वाहन परवाना मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वांरवार चकरा माराव्या लागत असल्याने दुुर्गम भागातील वाहनधारकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

सातपुड्याच्या डोंगराळ भागातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील वाहनधारकांना वाहने चालविणे व नियमांची माहिती मिळावी आणि परवाना मिळावा ह्या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन नंदुरबार कार्यालयातर्फे तालुकास्तरावर शिबिर घेण्यात येत होते. मात्र, हे शिबिर मार्च महिन्यापासून बंद असल्याने सातपुड्याच्या डोंगराळ भागातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील वाहनधारकांना परवाना मिळवण्यासाठी नंदुरबार प्रादेशिक परिवहन कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने गैरसोयीचे व त्रासदायक झाले आहे. तरी तालुकास्तरावर नियमांची माहिती मिळावी आणि परवाना देण्यासाठी शासनाकडून तळोदा, शहादा, धडगांव, नवापूर अशी तालुकास्तरीय शिबिर सुरू करण्यात यावीत अशी मागणी वाहनधांरकांकडून करण्यात येत आहे.

तालुकास्तरावरीय वाहन परवाना शिबिर बंद असल्याने जिल्हा मुख्य कार्यालयात जावे लागते. येण्यासाठी जास्तीचे अंतर होत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुकास्तरावरील तळोदा येथे परवाना शिबिर सुरू करण्यात यावे.

-वैभव पाडवी, वाण्याविहीर