शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

कोविड-१९मुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोलगी परिसरातील प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनाचा आधार घेत मोलगी-अक्कलकुवा येथे ...

कोविड-१९मुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोलगी परिसरातील प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनाचा आधार घेत मोलगी-अक्कलकुवा येथे दैनंदिन कामकाजासाठी यावे लागत असल्याने त्यांना गैरसोयीचे व त्रासदायक झाले आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या भागातील बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी अपेक्षा प्रवाशीवर्गांकडून व्यक्त केली जात आहे.

आमलीबारी, देवगोई, डाब, मोलगी, जमाना, धडगांव, भगदरी, पिपळखुटा, वडफळी या परिसरात अक्कलकुवा आगाराने बस सुरू करण्याची मागणी होत आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी, देवगोई, डाब या घाट सेक्शन रस्त्याच्या कामामुळेदेखील हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या बसेस बंद होत्या. मात्र, आता आमलीबारी, देवगोई व डाब या रस्त्यांचे काम पूर्णत्वाकडे असल्याने मोठी वाहने या मार्गावर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अक्कलकुवा आगारातून आमलीबारी, देवगोई, डाब, मोलगी, जमाना, धडगांव , भगदरी, पिपळखुटा, वडफळी या मार्गावरील बसेस सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय तत्काळ दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याकरिता बस सोयीची ठरत असते.

या आगारातून नंदुरबार, तळोदाच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. या मार्गावर प्रवासी बसची तासन्‌तास प्रतीक्षा करीत असतात. मात्र, वेळेवर बस मिळत नसल्याने इतर खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बसफेऱ्यात वाढ करण्याची गरज आहे.

दरम्यान, आमलीबारी, देवगोई, डाब मार्गे मोलगी, जमाना, धडगाव या घाट सेक्शनच्या मार्गावर मिनी बस सुरू करण्याची गरज मागणी मोलगी भाजपा शहराध्यक्ष सुनील राहसे यांनी आगारप्रमुखांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळी सहा वाजता अक्कलकुवा-डाब, मोलगी मार्गे धडगांव, साडेआठ वाजता भगदरी, सकाळी नऊ वाजता अक्कलकुवा-डाब, जमाना मार्गे, १० वाजता अक्कलकुवा मोलगी मार्गे पिपळखुटा, दुपारी चार वाजता अक्कलकुवा-मोलगी, पिपळखुटा मार्गे वडफळी, तसेच धडगांव येथून दुपारी चार वाजता मोलगी, अक्कलकुवा-नंदुरबार सुरू करावी, अशी मागणी शिक्षक, आरोग्य विभागासह नोकरी निमित्ताने ये-जा करणाऱ्या प्रवाशीवर्गांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, साडेपाच वाजेनंतर अक्कलकुवा येथून नंदुरबारकडे जाण्यासाठी बस नसल्याने गैरसोयीचे होते. त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता नंदुरबारसाठी बस सुरू करण्याची गरज आहे. -सुनील राहसे, भाजपा शहराध्यक्ष, मोलगी.