शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामांच्या ठिकाणी मार्गदर्शनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

नंदुरबार : शहरासह ग्रामीण हद्दीतील विविध भागात बांधकामे सुरू आहेत. या ठिकाणी येणाऱ्या मजुरांना कोरोनाबाबत मार्गदर्शन करून उपाययोजनांवर भर ...

नंदुरबार : शहरासह ग्रामीण हद्दीतील विविध भागात बांधकामे सुरू आहेत. या ठिकाणी येणाऱ्या मजुरांना कोरोनाबाबत मार्गदर्शन करून उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे. या कामगारांचे लसीकरणही झालेले नसल्याची माहिती देण्यात येत असून, प्रशासनाने बांधकाम कामगारांना वेगळ्या गटात समाविष्ट करून लसीकरण करण्याची मागणी आहे.

ग्रामीण हद्दीत सुरळीत वीज पुरवठा करावा

नंदुरबार : शहरालगतच्या होळतर्फे हवेली, वाघोदा, पातोंडा या भागात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी आहे. वीज पुरवठ्याअभावी या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्यावेळी तसेच दिवसा वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याचे सांगण्यात आले आहे.

चार वाजेनंतर होतोय शुकशुकाट

तळोदा : प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार सध्या तळोदा शहरात दुपारी चारवाजेपर्यंत विविध दुकाने सुरू ठेवण्यात येत आहेत. चार वाजेनंतर सर्व व्यवहार बंद होत असल्याने शहरात शुकशुकाट पसरत आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येत असल्याने नागरिकांची सोय होत आहे. दरम्यान चार वाजेपर्यंतच्या व्यवहारांमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांची तारांबळ उडत आहे.

भूजल पातळी खालावल्याने चिंता

बोरद : तळोदा तालुक्यातील शेतशिवारात विहिरी व कृषीपंपांची भूजल पातळी खालावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास अडचणी येत आहेत. पाणी कमी मिळत असल्याने बागायती पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

कृषी विभागाने मार्गदर्शन करावे

धडगाव : दुर्गम भागात तुरळक पावसाच्या बळावर पेरण्या सुरू झाल्या आहेत. बहुतांश शेतकरी ज्वारीची पेरणी करत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांची बोगस बियाणे देऊन फसवणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे कृषी विभागाने बियाणे मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना वन विभागाने भरपाई द्यावी

बोरद : तळोदा तालुक्यातील विविध भागात बिबट्याच्या हल्ल्यात पशुपालकांच्या जनावरांचा बळी जात आहे. यामुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यातून सावरण्यासाठी वन विभागाने पशुपालकांना शेळ्या तसेच गुरांची नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. वन विभागाकडून याबाबत तरतूद करण्यात येते; परंतु तळोदा तालुक्यात ही भरपाई उशिराने मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे.

रस्ता सुरू करावा

अक्कलकुवा : मोलगी ते अक्कलकुवा दरम्यान रस्ता काम सध्या वेगात सुरू आहे. हे काम पूर्ण होत आल्याने प्रवासी वाहनांना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मोलगीपर्यंत जाण्यासाठी दुसरा मार्ग अवलंबावा लागत असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत.

पावसाची प्रतीक्षा

शहादा : शहर व परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील विविध भागात अद्यापही मुसळधार पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे शेतीकामे रखडली आहेत. पाऊस नसल्याने वातावरणातील उष्मा नागरिकांना हैराण करणारा ठरत असल्याचे दिसून येत आहे.

भाजीपाला बाजारात वांग्यांची आवक

नंदुरबार : भाजी बाजारात पालेभाज्यांसोबत वांग्यांची मोठी आवक होत आहे. बाजारात गेल्या चार दिवसात सातत्याने वांगी विक्रीसाठी आणली जात आहेत. यामुळे किरकोळ बाजारात वांग्यांचे दरही कमी झाल्याचे भाजीपाला विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

हंगामी व्यवसायांवर होतोय परिणाम

नंदुरबार : पावसाळा सुरू झाला असला तरी शहरात मुसळधार अशा पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी, छत्र्यांची विक्री तसेच रेनकोट विक्री करणाऱ्यांचे व्यवसाय ठप्प आहेत. पाऊस बरसत नसल्याने नागरिकांकडून या वस्तूंची खरेदीच झालेली नाही.