शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे विक्रेत्यांचे पाळेमुळे खणण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मे रोजी कृषी विभागाच्या पथकाने कोठली, ता. शहादा येथे एका ...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मे रोजी कृषी विभागाच्या पथकाने कोठली, ता. शहादा येथे एका घरावर छापा टाकून अंदाजित एक लाख रुपये किमतीचे एचटीबीटी बियाणे जप्त केले. यंदाच्या खरीप हंगामाची ही पहिलीच कारवाई आहे. पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असले तरी तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचा शोध पथकाने घ्यावा व कारवाई करून अनधिकृत बियाणे लागवडीपासून सर्वसाधारण शेतकऱ्यांना वाचवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे विक्री होते हे सर्वश्रुत आहे. कमी दरात विक्री होत असल्याने सहाजिकच शेतकऱ्यांना हे बियाणे घेण्याचे आमिष कथित अनधिकृत विक्रेत्यांकडून केले जाते. शेतकरी या आमिषाला बळी पडून लागवड करतात. कृषी विभागाने निदान गावोगावी या बियाण्यांविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. अन्यथा अनधिकृत बियाणे लागवड करून शेतकऱ्यांना उत्पादनात मोठी झळ सोसावी लागेल. आधीच लॉकडाऊन तसेच तत्सम बाबींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

लॉकडाऊन तरीही बियाणे?

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी किरकोळ विक्रेता ते शेतकरी १ जूनपासून बियाणे विक्रीचे निर्देशित केले आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने बऱ्याच अवैध व्यवसायांना लगाम लागला आहे; परंतु परराज्यातून एवढा मोठा बियाणाचा साठा दरवर्षी तालुक्यात येतोच कसा? यात नेमका आशीर्वाद कोणाचा याचाही शोध घेणे गरजेचे आहे. दरवर्षी कृषी विभाग माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून मुद्देमाल जप्त करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर सोपस्कार तर होतोच; परंतु अनधिकृत बियाणे विक्रेत्यांची मोठी साखळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांचा शोध घेऊन पाळेमुळे खणण्याची गरज आहे, अन्यथा शेतकरी अनधिकृत व बोगस बियाणे विक्रेत्यांच्या आमिषाने पुरता देशोधडीला लागेल, यात शंका नाही.