शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतर्फे जिल्हाभरात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

नंदुरबार : इंधन दरवाढ आणि खतांच्या वाढणाऱ्या किमती याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. प्रशासनाला निवेदन देण्यात ...

नंदुरबार : इंधन दरवाढ आणि खतांच्या वाढणाऱ्या किमती याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. प्रशासनाला निवेदन देण्यात आले, तर काही ठिकाणी वाहनचालकांना गुलाबपुष्प देण्यात आले.

नंदुरबारात सकाळी तहसील कार्यालसमोर निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यात इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. उज्ज्वला गॅस देण्यात आले, परंतु दुसरीकडे गॅस दर वाढविण्यात आले. अशीच स्थिती खतांच्या किमतीबाबत आहे. खतांच्या किमती दुप्पट करण्यात आल्या. आधीच उत्पादन खर्च व पिकाला मिळणारा भाव याचा ताळमेळ जमत नाही. असे असताना आता खतांच्या किमती दुप्पट करण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे म्हटले आहे.

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, नितीने जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शहाद्यात गांधीगिरी

शहाद्यात तालुकाध्यक्ष माधवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध नोंदवत, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. युवक राष्ट्रवादीतर्फे वाहनचालकांना गुलाबपुष्प देण्यात आले.

यावेळी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अध्यक्ष माधवराव पंडित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, नगरसेवक इक्बाल शेख, वाईदभाई, दानिश पठाण, दिनेश पाटील, सुदाम पाटील, शीतल मराठे, रेश्मा पवार, शोभा पाटील, ज्योती पाटील, रवींद्र तिरमले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांनी वाहनचालकांना गुलाबपुष्प देत, गांधीगिरी आंदोलन केले.

नवापुरात निवेदन

नवापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडी, युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष अमृत लोहार, माजी सभापती विनायक गावीत, तालुका अध्यक्ष सुरेश कोकणी, न.पा विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक खलील खाटीक, युवा तालुकाध्यक्ष धिरसिंग वळवी, सुनील वसावे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष इंद्रीस पठाण, आकाश राजेश गावित, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, माजी युवा तालुकाध्यक्ष मनोज वळवी, खेकडा गावाचे सरपंच नितेश गावीत, शरद पाटील, संजय शिंदे, काना आतारकर, शाहरूख मेमन, राहुल आगळे, नीलेश गावीत यांच्या सह्या आहेत.

धडगावातही आंदोलन

धडगाव येथे झालेल्या आंदोलनात तालुकाध्यक्ष रोहित पावरा, तालुका उपाध्यक्ष राकेश पराडके, आकाश पाडवी, मंगलसिंग पावरा, राहुल पावरा उपस्थित होते.