शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे शहादा व नवापुरवरच लक्ष केंद्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत शहादा व नवापूर या दोन विधानसभा मतदार संघांची मागणी केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत शहादा व नवापूर या दोन विधानसभा मतदार संघांची मागणी केली आहे. त्यानुसार या दोनच जागांसाठी प्रबळ नेत्यांनी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केलेली असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी दिली. याबाबत माहिती देतांना गावीत यांनी सांगितले, राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आणि इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी शहादा येथे झाल्या. मेळाव्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उन्मेश पाटील, निरिक्षक नाना महाले यांनी मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुका पुर्ण ताकदीने लढविण्यासाठी पक्ष कार्यकत्र्यानी मेहनत घ्यावी असे आवाहन केले. आघाडी झाल्यास शहादा व नवापूर या दोन विधानसभा मतदारसंघांची मागणी आहे. त्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसादही मिळत असल्याने पदाधिका:यांनी तयारी करावी असे आवाहन उन्मेश पाटील व नाना महाले यांनी मेळाव्यात केले. जिल्ह्यातील चारही मतदारसंघासाठी मोठय़ा प्रमाणावर इच्छूक उमेदवार होते. परंतु पक्षाने शहादा व नवापूर मतदारसंघावरच लक्ष केंद्रीत केल्याने या दोन मतदारसंघासाठीच मुलाखती झाल्या. शहादा मतदारसंघासाठी स्वत: राजेंद्रकुमार गावीत तर नवापूर मतदारसंघासाठी माजी आमदार शरद गावीत यांनी इच्छूक म्हणून तयारी दर्शविली. शिवाय तेच प्रमुख दावेदार असल्याने अन्य पदाधिका:यांनी त्यांच्या नावाला पाठींबा दिला. परिणामी इतर इच्छूकांनी मुलाखती दिल्या नसल्याची माहितीही राजेंद्रकुमार गावीत यांनी दिली.